Breaking News
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक भागाला चवीची एक वेगळी परंपरा लाभली आहे. घाटावरील जेवण असो, खानदेशी असो, विदर्भातील असो किंवा कोकणातील असो, प्रत्येक भागामध्ये एक अप्रतिम चवीचे विशिष्ट पदार्थ तिथल्या लोकांची किंवा तिथल्या भागाची ओळख बनली आहे. कुठे पुरणपोळी व कटाची आमटी तर कुठे शेवभाजी, मसाला भात सणासुदीला त्या त्या भागातील लोकांच्या ताटाचा विशेष अविभाज्य भाग बनले आहेत. आज आपण पुण्याची ओळख असलेली सुप्रसिद्ध मासवडी आपल्या शहरात कुठे मिळते हे पाहणार आहोत. तर आता पुण्याच्या या सुप्रसिद्ध मासवडीचा आस्वाद घ्यायला पुण्यातच जावं लागणार नाही तर तो इथेच नवीन पनवेलमध्ये 'जुन्नरकर होम किचन'च्या माध्यमातून घेता येईल आणि शहरातच घरबसल्या या पारंपारिक घरगुती चवीच्या मासवडीचा बेत आखता येईल. मूळचे पुणे येथील जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावचे देवराम सबाजी हाडवळे नवीन पनवेल येथील सेक्टर 4 मधून गेल्या 3 वर्षांपासून खवय्यांच्या मासवडीची मागणी पूर्ण करत आहेत. ते 2019 पासून घरातूनच ही सेवा पुरवत आहे. मासवडीथाळीमध्ये वडी, रस्सा, बाजरीची भाकरी आणि भात असा सरंजाम असतो. हे सर्व तयार करण्यासाठी साधारणतः चार ते पाच तासांचा कालावधी लागत असल्याने एक दिवस अगोदर ऑर्डर घेतली जाते. त्यातही नियमितपणे बुधवार, शुक्रवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवसांची ऑर्डर एक दिवस आधी घेणे सुरू असते. टेक अवे किंवा फ्री होम डिलिव्हरी अशा दोन सुविधा सध्या उपलब्ध आहेत. भविष्यात क्लाऊड किचनच्या माध्यमातून अधिक सेवा देण्याचा त्यांचा मानस असल्याचे हाडवळे सांगतात. मासवडीथाळी बनवण्यापासून ती वेळेत पोहोचवण्यापर्यंत हाडवळे यांचे संपूर्ण कुटुंब झटत असते. मासवडी बनविण्यासाठी सफेद तीळ, कांदा, खोबरे, लसूण वापरले जाते. ज्या मसाल्यामुळे मासवडीला एक वेगळी विशिष्ठ चविष्ट प्राप्त होते, तो घरगुती स्पेशल मसाला हाडवळे स्वतः बनवतात. त्यामुळे भन्नाट चव असणारी 'जुन्नरकर होम किचन'ची मासवडी कमी कालवधीतच प्रसिद्ध येत आहे. जुन्नरकर होम किचन आठवड्याला सुमारे 70 ते 80 प्लेट मोफत घरपोच सेवेच्या माध्यमातून खवय्यांना त्यांच्या घरी पोहचवत आहेत. सोशल मीडियातूनही या मासवडीची मागणी करता येते. त्यासाठी फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध आहे. 'जुन्नरकर होम किचन' च्या फेसबुक पेजला 5.9 लाईक्स आहेत. तर इंस्टाग्रामला ही 550 फॉलोव्हर्स आहेत. व्हाट्सअपच्या माध्यमातून ही मासवडी तितकीच लोकप्रिय आहे. या मासवडीची चव चाखायची असेल तर पनवेल, सेक्टर 4 येथे यावे लागेल किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवरून किंवा फोन नंबरवरून ऑर्डर द्यावी लागेल. नवी मुंबईमध्ये आता मासवडी म्हणजे जुन्नरकर फोन किचन असेच समीकरण होऊ घातले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे