Breaking News
द केरळ स्टोरी या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चा सुरु आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. द केरळ स्टोरी हा चित्रपट भारतातील काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. पण पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. ‘द केरळ स्टोरी' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला 8.03 कोटी एवढी कमाई केली.
एका रिपोर्टनुसार, द केरळ स्टोरी या चित्रपटानं 13 व्या म्हणजेच बुधवारी दिवशी 9.25 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई आता 165.94 कोटींवर गेली आहे. द केरळ स्टोरी आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदा शर्माच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तिनं या चित्रपटात शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर अनेक जण या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अदाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
2008 मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्या 1920 या हॉरर चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अदानं कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अदाला द केरळ स्टोरी या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळत आहे. आता अदाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
द केरळ स्टोरी या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. तर काही जण या चित्रपटावर टीका करत आहेत.मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा द केरळ स्टोरी हा सिनेमा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai