Breaking News
शशिकांत पवार प्रोड्कशन निर्मित, शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्माता असलेला आणि सिद्धहस्त लेखक प्रताप गंगावणे लिखित, अनुप जगदाळे दिग्दर्शित रावरंभा ने मारली बाजी. 1672 च्या काळात घडलेली एका मावळ्याची एक प्रेम कहाणी, छत्रपती शिवरायांच्या प्रति निष्ठा, स्वराज्याप्रति निष्ठा, त्याग हे या सिनेमाची कहाणी...
ओम भुतकरचे मुळशी पॅटर्ननंतरचे दमदार पदार्पण, सोबत रंभाच्या भूमिकेत मोनालीस बागल, साक्षात प्रतापराव गुजर समोर उभे आहेत अशी लक्षवेधी भूमिका साकारणारे अशोक समर्थ,बहलोल खान ताकतीने साकारणारे बॉलीवूड कलाकार मीर सरवर, अतिशय सुंदर अभिनय केलेला, खलनायक साकारलेलं संतोष जुवेकर,महाराष्ट्राचा लाडका कुशल बद्रिके खलनायक साकारताना,रोहित चव्हाण,छोटी आणि दमदार भूमिका साकारणारे किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर,आदिलशाहची भूमिका साकारणारे मयुरेश पेम ,रुक्मिणी सुतार, बाळकृष्ण शिंदे,दिनकर पवार या मावळ्यांच्या भूमिकेत रांगडी भूमिका करणारे निर्माते स्वतः शशिकांत पवार अशीं प्रचंड तगडी स्टार कास्ट असलेला रावरंभा..
हिंदी सिनेमाला लाजवेल अशी फोटोग्राफी केली आहे संजय जाधव यांनी. मराठी सिनेमाला अभाव असतो बजेट आणि तंत्रज्ञान, पण रावरंभाने त्या बाबतीत कोणतीही कसर ठेवली नाही,त्याचे पूर्ण श्रेय शशिकांत पवार यांना जाते. व्हीएफएक्सचे अदभुत काम केलं आहे वोट स्टुडिओस् पुणे, आजपर्यतच्या मराठी ऐतिहासिक सिनेमातील सर्वोत्कृष्ट काम जयेश मलकापूरे यांनी केलं आहे, बॅक ग्राउंड आदित्य बेडेकर यांनी केलं आहे ते ही एखाद्या हिंदी सिनेमा ला लाजवेल अस, वेशभूषा पूर्णिमा ओक यांची तर अमितराज यांचं अतिशय श्रवणीय संगीत,गुरूं ठाकुर,क्षितिज पटवर्धन यांनी गीतें अदभूत आहेत. अतिशय सुंदर कथा बांधणी,अंगावर काटे येणारे संवाद,यात प्रताप गंगावणे यशस्वी झाले आहेत. दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी केलेलीं धडपड सार्थकी लागलेली दिसत आहे. एक परिपूर्ण आणि अनेकदा डोळ्यांच्या कडा पणावणार, अंगातील रक्त सळसळवणारा एक सुंदर सिनेमा म्हणून रावरंभा कायम मनात आणि हृदयात राहील हे नक्की..
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai