निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांनी केले 10 लाख बियांचे रोपण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2023
- 610
उरण ः सिडको अधिकारी तसेच निसर्ग प्रेमी गडप्रेमी हितेंद्र घरत हे वेगवेगळ्या डोंगरावर गेली 25 वर्ष बिजारोपण करीत आले आहेत. यंदा 26 व्या वर्षी खारघर येथील फणसवाडी येथील डोंगरावर मान्यवरांच्या उपस्थितीत 10 लाख बीजांचे रोपण करण्यात आले.
आपल्या देशात व राज्यात वाढत्या औद्योगिकारणामुळे निसर्ग लोप पावत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ही ढासळत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहे. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उरणमधील निसर्गप्रेमी हितेंद्र घरत हे गेली 25 वर्षे फळांच्या हजारों बिया गोळा करून त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात टाकीत आहेत.
थेंब थेंब पाणी साचून तळे बनते एक एक झाडांपासून जंगल बनत म्हणून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. पेरू तरच उगवेल या उक्ती प्रमाणे मे महिना म्हणजे फणस, आंबे, काजू ,चिंच, करवंदे, जाम, जांभळे, रांजणे अशा अनेक फळे खायची चंगळ असते. परंतु आपण या फळांचा आस्वाद घेऊन त्यांच्या बिया फेकून देतो. मात्र तसे न करता खाल्लेल्या फळांच्या बिया एक भांड्यात जमा करा. त्यांना चांगल्या उन्हात सुकवा. नंतर एका पिशवीत किंवा गोणीत भरून ठेवा व त्या सर्व सुकलेल्या बिया पावसाळा सुरू होण्याअगोदर कुठल्या तरी किल्ल्याच्या सभोवती किंवा रानात, जंगलात किंवा कुठल्याही रस्त्याच्या दोन्ही बाजूस थोड्या थोड्या टाकत जा.
जर आपण एक हजार बिया या वर्षी पेरल्यात तर त्या बियांपैकी दहा झाडे तरी नक्कीच उगवतील. यामुळे तुमच्या कष्टाचे सार्थक झाले असे समजा. आपण सर्व या धरती मातेचे व सृष्टीचे देणेदार आहोत. अशा प्रकारचा उपक्रम उरण केंगाव येथील सिडको कर्मचारी असलेले हितेंद्र सदाशिव घरत गेली 25 वर्ष न चुकता लाखों बिया दरवर्षी कुठल्या ना कुठल्या जंगलात पेरत आहेत. यातील हजारो झाडे जगतील व त्यांच्या फळांचा आस्वाद सर्वांना घेता येईल व निसर्गाची जपवणूक केल्याचा आगळा वेगळा आनंद मिळत असल्याचे निसर्गप्रेमी हितेंद्र घरत यांनी सांगितले. यंदा त्यांनी 10 लाख बियांची साठवणूक करून त्याचे रविवार 2 जुलै रोजी नवी मुंबई खारघर येथील फणसवाडी डोंगरावर रोपण करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai