महिलांसाठी पालिकेतर्फे टेलरिंग प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2023
- 243
नवी मुंबई ः शिवणकलेची आवड व त्याविषयीचे रितसर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या महिला व मुलींकरीता नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने टेलरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकार मान्यताप्राप्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांच्या माध्यमातून हे टेलरिंग प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.
महिला सक्षमीकरणासाठी महापालिका विविध कल्याणकारी योजना नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने राबविल्या जात असताना टेलरिंगच्या माध्यमातून महिला व मुलींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविणारा हा उपक्रम आहे. सन 2023-24 वर्षातील या सहामाही व्यवसाय अभ्यासक्रमाचे 01 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2023 असे प्रवेश सत्र आहे. यामध्ये दोन व्यावसायिक अभ्यासक्रम असून पहिल्या शिवण-कर्तन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 7 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असून यामध्ये लहान मुले, स्त्रिया व पुरुष यांचे एकूण 30 प्रकारचे कपडे तयार करण्याचे शिकविण्यात येते. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्पेशलायझेशन इन ब्लाऊज अभ्यासक्रमासाठी इ. 8 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असून त्यासोबत शिवण-कर्तन ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा लाभ नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवासी असणाऱ्या महिला व मुली यांनाच घेता येणार असून प्रवेश घेताना मालमत्ता कराची पावती, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड यापैकी एक वास्तव्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांत उपलब्ध आहे.
प्रवेश प्रक्रियेकरीता कागदपत्र
- शाळेचा दाखला व गुणपत्रक
- विवाहीत महिलांसाठी विवाह नोंदणी दाखला
- स्वत:चे आधार कार्ड व पॅन कार्ड
- प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै
प्रवेश शुल्क रू. 300 - अंतिम दिनांकानंतर 50 रु. विलंब
संपर्क क्रमांक
- 9867185830 /9769901354
- 022-27567279 / 9594841666
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai