कंटनेरचा ब्रेक फेल झाल्याने पाच गाड्यांचे नुकसान
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2023
- 250
नवी मुंबई : नवसारी कडून मुलुंडकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक झाल्याने हा कंटेनर चार गाड्या आणि एका रिक्षाला धडकला. यात रिक्षातील एक प्रवासी महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात ठाणे बेलापूर मार्गावरील रबाळे अंडरबायपास येथे झाला आहे. अपघातामुळे पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती.
नवसारी येथून मुलुंड येथे सिमेंट घेऊन एक कंटेनर जात होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास रबाळे एमआयडीसीतुन ऐरोलीच्या दिशेने जाताना अंडरपासच्या ऐन उतारावर या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. उतारावर ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर एकदम सुसाट खालच्या दिशेने जात असल्याने कंटेनर चालकाने पदपथावर कंटेनर चढवला मात्र तरीही कंटेनर वर नियंत्रण न राहिल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या असलेल्या 5 गाड्यांना कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये आर्टिगा, रिक्षा, टेम्पो, होंडासिटी व महिंद्रा एक्स यु व्ही अशा 5 गाड्यांना जोरात धडक दिल्याने या गाड्यांचे भरपूर नुकसान झाले आहे.
रिक्षा तर पूर्णपणे चेपली गेली असून यातील एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे. तर या जखमी महिलेला रिक्षातून बाहेर काढताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai