पालिकेत तात्पुरती तासिका शिक्षक भरती
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2023
- 380
नवी मुंबई ः महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विभागाकरिता शिक्षक पदभरती करणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची 10 जुलै 2023 रोजी मुलाखत होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दु आणि इंग्रजी माध्यमातील 183 पदांसाठी तात्पुरत्या स्वरुपात शिकवणी तत्वावर ही भरती असणार आहे.
नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील प्राथमिक व माध्यमिक विभागाकरिता शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात शिकवणी तत्वावर शिक्षक भरती करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या संवर्गातील दिलेल्या पदभरतीसाठी शैक्षणित पात्रता व अनुभव धारक इच्छुक उमेदवारांनी वॉक इन इंटरव्हयूव करिता 10 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन पालिकने केले आहे.
पदाचे नाव प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक
- एकूण रिक्त पदे : 183
- प्राथमिक शिक्षक 123
- माध्यमिक शिक्षक- 60
- खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे.
- मागासवर्गीय 5 वर्षे सूट
महत्वाच्या तारखा
- मुलाखतीची सुरवात 10 जुलै 2023 दुपारी 12 वाजता.
- मुलाखतीचा शेवट 10 जुलै 2023 संध्याकाळी 5 वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय तिसरा माळा, ज्ञान केंद्र, सी.बी.डी बेलापूर.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai