खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नागपूरच नव्हे, सारा महाराष्ट्र कलंकित झाला...

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नागपूरमध्ये जाऊन काही बोलले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी साऱ्या महाराष्ट्रात त्यांचा निषेध नोंदवला. राज्याच्या भल्याचीही ज्यांना अक्कल नाही तेही यानिमित्त बाहेर आले. स्पष्ट बोललं की माणसाला झोंबतं. जे स्पष्ट बोलतात तेच दिसतात. महाराष्ट्रात असं उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत नसते. उध्दव ठाकरे यांनी ही हिंमत थेट नागपूरमध्ये जाऊन दाखवली आणि कोण गजहब झाला. आपल्या नेत्याची कोणी निंदा नालस्ती केली तर त्याचा निषेध करायचा अधिकार त्याच्या समर्थकांना असायलाच हवा. पण ज्याच्या समर्थनार्थ आपण जे करतो, तो त्या समर्थनाच्या पात्रतेचा आहे काय, याचा विचार केला पाहिजे. जो कलंकित शब्द उध्दव यांनी फडणवीस यांच्यासाठी वापरला त्याहून कितीतरी वाईट शब्दप्रयोग भाजपचे नेते आणि त्यांचे समर्थक उघडपणे विरोधकांसाठी करत असतात. यातून उध्दव ठाकरे सुटण्याचा प्रश्न नाही. असलेच शब्दोच्चार उध्दव ठाकरे यांच्याविषयी काढताना भाजपच्या नेत्यांची जीभ तेव्हा अडखळली नाही. आजारी असलेल्या व्यक्तीविषयी तर प्रत्येकाच्या मनात सहानुभूती असली पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचा जराही लवलेश भाजपचे नेते व  त्यांच्या कार्यकर्त्यांकडे नाही. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं, अशी त्यांची गत झालेली दिसते. नागपूरमध्ये जाऊन उध्दव ठाकरे यांनी भाजप नेते आणि आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, असं वक्तव्यं केल्याने भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला. खरं तर उध्दव ठाकरे अर्धंच खरं बोलले. देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेच्या हव्यासाने नागपूरच बदनाम झाले नाही तर साऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. देशात खालच्या पातळीच्या राजकरणासाठी पूर्वी उत्तरप्रदेश व बिहारची नावं घेतली जायची पण आज त्याऐवजी महाराष्ट्राचं नाव घेतले जात आहे. यावरून महाराष्ट्रातील एकूणच राजकीय परिस्थितीची जाणीव भाजपच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. एक शहर वा राज्य उगाच कलंकित होत नसते तर तेथील व्यक्तींच्या कृतींनी  ते विकृत बनते तेव्हा शहराला कलंक लागला असं म्हटलं जातं.

फडणवीस यांच्यावर असे बोल खाण्याची वेळ ही येणारच होती. नागपूरला कलंक म्हणून तिथे राजकारणात वावरणाऱ्या नितीन गडकरींपासून इतर नेत्यांना का संबोधलं जात नाही? त्यासाठी फडणवीसांचंच नाव का घेतलं जातं, याचा विचार भाजपच्या नेत्यांनी करावा. त्यांनी यासाठी हवं तर आत्मपरीक्षण करावं. ते केलं तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची जाण त्यांना आहे, असं म्हणता येईल. कलंकित म्हणून दोष दिला म्हणून राज्यभर पुतळे जाळून आणि पायदळी तुडवून काहीही होणार नाही. लोकांची मनं जाणून घेतली तर भाजप नेत्यांचे डोळे उघडतील. समर्थक वगळता कोणीही फडणवीस यांच्या कृतीचं समर्थन करताना दिसत नाही. उलट महाराष्ट्र खड्डयात घातल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. लोकांमध्ये फिरलं तर उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या विशेषणांहून कितीतरी लाखोल्या भाजप नेत्यांना ऐकाव्या लागतील. उगाच कोणाची तळी उचलून काहीही होणार नाही.

उध्दव ठाकरे यांना इतक्या खाली का यावं लागलं, याचा विचार भाजपचे नेते करणार आहेत की नाहीत? महाराष्ट्रात आजवरच्या राजकारणात या राज्याची अवहेलना होईल, असं वर्तन काही नेत्याने केलं नाही. अगदीच अतिरेक म्हणजे   काहीजण दुसऱ्या पक्षात सामीलही झाले. पण घर फोडून त्यातून बापालाच रस्त्यावर काढण्याचं पातक कोणी केलं नाही. याला अपवाद केवळ फडणवीस आहेत. राज्यातील राजकीय पक्षफोडून तो पक्ष आपलाच असल्याची अक्कल कोणाही नेत्याने ना स्वत: वापरली ना इतरांना दिली. सत्तेसाठी माणसाने किती खाली यावं, याला काही मर्यादा आहेत. या मर्यादा पार केल्या की त्याला बोल हे खावेच लागतात. सत्तेसाठी इतरांना इडीच्या जाळ्यात ओढण्याचं कलुशी कारस्थान राज्यात आजवर कोणालाच जमलं नाही. इडी नावाची संस्था देशात होती, हेही कोणाच्या गावात नव्हतं. ती अचानक बाहेर आली जेव्हा सत्तेची हाव वाढली. यासाठी अनेकांना अडकवून वर्षानुवर्षं कोठडीत सडवण्याचा अघोरी प्रकार सुरु आहे. परंतु, ज्यांनी सत्तांतर केले त्यांना मात्र चौकशीच्या ससेमिऱ्यातून सूटका केल्याचे ढळढळीत दिसते. त्यामुळे ज्यांनी ही अघोरी पद्धत अवलंबली त्यांच्याच वाट्याला कलंक सारखी विशेषणं येतात. यामागे कोण होतं? ज्या तथाकथित कलंकितांविरोधात या यंत्रणांचा वापर केला त्या भुजबळ, मुश्रिफ, पवार, तटकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे कलंकित नाही का? हे नेते याआधी नालायक ठरले परंतु, अचानक ते पावन व्हावेत हा सुद्धा नालायकपणाच नाही का? सार्वजनिक जिवनात मनाची लाज बाळगणाऱ्या नेत्यांनी असली कलंकित कृत्य कधीच केली नसती. पक्ष फोडून जर सत्ता मिळणार असेल तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही शिवणार नाही असे म्हणणाऱ्या अटलजींच्या विचारांचा वारसा चालवणारा हाच भाजप आहे का?असा प्रश्न आता भारतीयांना भेडसावू लागला आहे. सत्तेसाठी अनैतिक मार्ग स्वीकारावे लागत असतील व तोच मार्ग उध्दव ठाकरे यांनी केवळ कलंकित शब्दापुरता वापरला तर एवढे गहजब कशासाठी? विदर्भाने मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, जवाहरलाल दर्डा, श्रीकांत जिचकार, आताच्या राजकरणात नितीन गडकरी अशी असंख्य प्रतिभावान नेते दिले. त्यांच्यातल्या अनेकांनी तर महाराष्ट्रापासून वेगळं होण्याचीही भूमिका मांडली. या सर्वांनीच विदर्भाचं हित बघितलं. त्यासाठी नको ते मार्ग पत्करले नाहीत की विदर्भाला विरोध करणाऱ्यांवर यंत्रणांचा वापर केला नाही. 

बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं म्हणून जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. आपला पक्ष सत्तेवर असल्याने तर ही जबाबदारी कित्तेकपटीने वाढत असते. सरकार स्थापनेपासून ते कोरोना काळातला लेखाजोखा काढला तर  चार बोटं भाजपकडे आहेत याचंही भान त्यांना नाही. सत्तेसाठी पहाटेचा शपथ घेणाऱ्यांची तुलना कशाने करायची? कोरोना काळात सातत्याने राजभवनाच्या येरझाऱ्या घालणाऱ्यांची बोलवण कशी करायची? राज्यात लोकं मरणासन्न झाली असताना आमदार आणि खासदारकीचा फंड खासगी पीएम केअरला द्या असं सांगणाऱ्याचं काय करायचं? सत्तेसाठी ईडी आणि इतर यंत्रणांचा बेमालूम वापर करणाऱ्यांना कसली बक्षिसं द्यायची? सत्तेसाठी पक्ष फोडून त्यांचा बाप बदलण्याची क्लूप्ती देणाऱ्यांना कशात तोलायचं? लबाड पोलीस आयुक्तासाठी संपुर्ण पोलीस दलाला बदनाम करणाऱ्याला काय म्हणायचं? सत्तेसाठी केलेल्या या सगळ्या घटना राज्याच्या राजकीय संस्कृतीला कलंक फासणाऱ्या नाहीत? तेव्हा रस्त्यावर तमाशा घालण्यापेक्षा भाजप नेत्यांनी आत्मपरिक्षण करावं. प्रदेशाध्यक्षाने समजूतीचे चार शब्द आपल्या कथित नेत्यांना सांगितल्यास त्याने पक्षाचं आणि नेत्यांचंही कल्याण होईल...


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट