लायन्स क्लब ऑफ उरणचे 51 व्या वर्षात पदार्पण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 31, 2023
- 754
उरण ः लायन्स क्लब उरणचा 51 वा शपथविधी सोहळा भोईर गार्डन रेस्टॉरंट उरण येथे ला.सदानंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट 3231अ4 चे सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन संजीव सूर्यवंशी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
लायन्स क्लबची 50 वर्षाची उज्वल परंपरा कायम राखताना सर्व क्लब मेंबर्स आणि लिओ यांना सोबत घेऊन डिस्ट्रिक्टच्या अष्टसूत्रीवर काम करण्याचा मानस अध्यक्षा ला. निलिमा यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोठावदे यांनी एन आय हायस्कूल उरणच्या पाच गरीब विद्यार्थ्यांच्या फीचा रुपये 7750 चा धनादेश दिला. डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन ट्विंनिंग विजय गणात्रा यांच्यातर्फे आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. स्वप्ना सदानंद गायकवाड यांनी फुटबॉल क्लब ऑफ उरण यांना रुपये 5000 चा धनादेश दिला. डिस्ट्रिक्टमधून आलेले विविध पदाधिकारी मिलिंद पाटील, नयन कवळे, प्रवीण सरनाईक, नितीन अधिकारी, अनिल म्हात्रे, अनुप थरवानी, रमाकांत म्हात्रे यांच्या उपस्थितीने सोहळ्याला रंगत आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai