जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 28
उरण ः जेएनपीटीच्या ऑइल जेट्टीवर तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना जेटीवर ग्रॅसचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. करावली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील रहिवासी राजेंद्र शिंदे, गणेश बेन्झोप्लास्ट कंपनीचे अधिकारी आणि उरण तालुक्यातील पिरकोन येथील जगन्नाथ गावंड, कंत्राटी कामगार, यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
हा अपघात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिगिंगसारखे अत्यंत धोकादायक काम सुरू असताना कंपनी आणि संबंधित ठेकेदाराने सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. हेल्मेट, परमिट टू वर्क, सेफ्टी ऑडिट, गॅस टेस्टिंग यासारख्या मूलभूत सुरक्षा उपायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हा स्फोट झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कंपनी आणि ठेकेदाराला कामगारांच्या जीवाची किंमतच नाही. फक्त उत्पादन आणि नफा हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, अशी टीका संघटनांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai