सनद पॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी भूमी अभिलेख उपअधीक्षकांना निवेदन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 04, 2023
- 507
उरण ः उरण तालुक्यातील बालई काळाधोंडा गावठाण हद्दीत अनेक नागरिक गेली अनेक वर्षे राहत आहेत. नागरिकांच्या या राहत्या घरास सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालय मधील उप अधीक्षक आतार व तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेउन त्यांना निवेदन दिले. बालई काळाधोंडा गावठाण हद्दीतील नागरिकांना सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
1932 च्या इंग्रजांनी केलेल्या मूळ गावठाण नकाशाच्या मोजणीनंतर विस्तारित गावठाणाचा नकाशा केंद्र किंवा राज्य सरकारने बनविलाच नाही. स्वतंत्र भारतात निष्क्रिय राहिलेल्या उरण तहसील आणि उरण भूमिअभिलेख कार्यालयाची ही अक्षम्य चूक 85 टक्के मागासवर्गीय जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे. घराची घरपट्टी ही केवळ करपावती आहे. जमीन मालकी साठी घराखालची जमीन घरमालक असलेल्या उरणकरांची खरी खुरी प्रॉपर्टी आणि आयुष्य भराची ठेव आहे. बाळई काळा धोंडा येथील जागरूक चर्मकार, कराडी आगरी कोळी बांधवानी घरांचे गावठाणाचे लोकवर्गणी काढून केलेले नकाशे, केलेला शासकीय पत्रव्यवहार हा ठाणे रायगड पालघर मुंबई साठी आदर्श ठरला. उरणच्या तहसीलदार आणि भूमी अभिलेख विभाग यांनी याची प्रथम सुनावणी लावून दिलेला ऐतिहासिक प्रतिसाद हा शासन आपल्या शेकडो वर्षाच्या चुका सुधारत असलेल्या प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण ठरत आहे असे राजाराम पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक आतार व तहसीलदार उद्धव कदम यांनी शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची समस्या समजावून घेत सदर समस्या वरिष्ठापर्यंत पोहोचवून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील, बालई काळा धोंडा ग्रामविकास परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील , सचिव रविंद्र चव्हाण, खजिनदार- नितिन चव्हाण,सहसचिव- राहुल चव्हाण, चाणजे ग्रामपंचायत सदस्य- बबन चव्हाण, ग्रामस्थ -सूजित शिरढोणकर, मनोज भोईर , अनिल चव्हाण, शांताराम तुरळकर,दुर्गा गुडे, परेश चव्हाण, विनोद सावर्डेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai