करंजा बंदरात मासळीची आवक वाढली
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 24
घाऊक बाजारात दरही चढे
उरण : खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात बांगडा, रिबन फिश तसेच कुपा या जातीचे मासे आढळत आहेत. त्यामुळे करंजा बंदरात मासळीची आवक वाढली असून या माशांना घाऊक बाजारात चढे दरही मिळत असल्याने मच्छीमार सुखावला आहे. मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगडा, रिबन फिश आणि कुपा यांचे दर किलोमागे 200 पेक्षा अधिकचे मिळत आहेत. यातील चांगल्या प्रतीच्या मासळीची परदेशात निर्यातही केली जात आहे. मुंबईच्या ससून बंदराला पर्याय ठरलेल्या उरणच्या करंजा बंदरातील मासळीच्या निर्यातीत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी करंजा बंदरातून 600 कोटी पेक्षा अधिकच्या मासळीची निर्यात झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या वाढत्या निर्याती बरोबरच मासळीची आवकही वाढल्याने मच्छीमारांना फायदा होत आहे.करंजा बंदर 2024 पासून सुरू झाले. याचा लाभ उरणसह रायगड जिल्ह्यातील अनेक मच्छीमारांना होत आहे. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी ही उपलब्ध होत असल्याने हे बंदर महत्त्वाचे ठरले आहे. 2026 मध्ये आतापर्यंत 250 ते 300 कोटी रुपयांची मासळी निर्यात करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
करंजा येथील काही मच्छीमारांनी आपल्या परिचित स्थानिक दलालांवर विश्वास टाकून लाखो रुपयांचे मासळीचे व्यवहार केले होते. सुरुवातीला त्यांनी मच्छीमारांना पैसे दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. या संदर्भात पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरांवर मात करीत मच्छीमारांनी नव्या जोमाने पुन्हा एकदा सुरुवात केली असून सध्या मासळीला उत्तम दर मिळत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
करंजा बंदरात सध्या मोठ्या प्रमाणात मासळीची आवक वाढली आहे. यामध्ये परदेशात निर्यात होणाऱ्या मासळीचेही प्रमाण वाढले आहे. यावर्षी मासळीला चांगला दर मिळत आहे. - रमेश नाखवा, माजी उपाध्यक्ष, करंजा मच्छीमार सहकारी संस्था
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai