उरण न्यायालयातील ई-फाईलींग सुविधा सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 07, 2023
- 466
उरण ः सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना व निर्देशानुसार रायगड जिल्हा व इतर ठीकाणच्या न्यायालयातील कारभार पेपरलेस करण्याचे ठरले आहे. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी उरण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये ई-फाईलींग अँड फॅसीलीटी कार्यप्रणालीचे उद्घाटन प्रमुख न्यायाधीश विकास बडे तसेच न्यायाधीश निलेश वाली यांचे हस्ते करण्यात आले.
त्यावेळी उरण वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.दत्तात्रेय नवाळे यांनी सांगीतले की सदरची ई-फायलींग अँड फॅसीलीटी सेवा वकील व पक्षकार या दोन्हीसाठी उपयोगी पडणार असुन आत्ता दाखल होणारी नवीन प्रकरणे (खटले, दावे) ऑनलाईन पध्दतीने दाखल करावी लागतील. यासाठी लागणारे साहीत्य जसे संगणक, स्कॅनर, प्रिंटर, वेब कॅमेरा व इतर उपकरणे बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा यांजकडुन पुरवण्यात आली आहेत. तसेच या ई-फायलींग अँड फॅसीलीटी सुवीधा केंद्रात वकील व पक्षकार यांचे मदती करीता संगणक परीचालकाची सुध्दा नियुक्ती करण्यात येणार आहे. ई-फायलींगचे काम वाजवी दरात करणार येणार आहे असेही ऍड.दत्तात्रेय नवाळे यांनी सांगितले.
सदरचे वेळी जेष्ठ वकील ऍड.एम. एम. मोकल, ऍड.विजय पाटील, ऍड.पराग म्हात्रे, ऍड.प्रसाद पाटील व ऍड.किशोर ठाकुर, ऍड.सागर कडु, ऍड.संतोष पाटील आदी वकील मंडळी हजर होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai