नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च ताशेरे
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 13, 2023
- 518
आमदार अपात्रता प्रकरणी होत असलेल्या दिरंगाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने सूनावले
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कडक शब्दांत राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे.
सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तसेच, अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल, असंही सरन्यायाधीश सुनावणीदरम्यान म्हणाले आहेत. आम्ही हे जाणतो की विधानसभा अध्यक्षांचं पद हे संसदीय सरकारचा भाग आहे, त्यामुळेच आम्ही कुठलीही टाईमफ्रेम देत नाही आहोत, पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावंच लागेल, असंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. जर निश्चित वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून आलं नाही, तर मात्र आम्हाला आदेश द्यावे लागतील आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या मर्यादेत अध्यक्षांना निर्णय द्यावाच लागेल, असंही सरन्यायाधीश म्हणाले. मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या, नाहीतर नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन आखून द्यावी लागेल. दोन महिन्यांची टाईमलाईन असून शकते, ज्यामध्ये अध्यक्षांना बंधनकारक असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनंतर विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- कोर्टाच्या आदेशाचा, भूमिकेचा आदर ठेवेन
न्यायालयाने फटकारल्यावर राहुल नार्वेकर म्हणाले, विधानसभा अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना विधिमंडळाची, विधानसभेची सार्वभौमत्वता राखण हे माझ कर्तव्य आहे. त्याप्रमाणे कायदेशीर बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही. याचे भान ठेवत मी निर्णय घेईन. तसेच मी निर्णय घेत असताना कोर्टाच्या आदेशाचा, भूमिकेचा आदर ठेवेन. त्याप्रमाणे संवैधानिक तरतुदी आणि नियमानुसार मी निर्णय घेईन.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai