प्रकल्पबाधितांची जनगणना करावी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2023
- 359
दशरथ भगत यांची मागणी
नवी मुंबई : जल, जंगल आणि जमिनीवरील विकास प्रकल्पात बाधिताचे मूल्यांकन करणे आवश्यक असताना ते केले जात नाही. देशातील नागरिकांची, जातीची व आर्थिक जनगणना प्रमाणे प्रकल्प बाधितांची देखिल जनगणना करावी अशी मागणी नवी मुंबई पुनर्वसन सामजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांनी केली.
नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचा 5 वा वर्धापदिन आणि दि. बा. पाटील स्फुर्तीस्थान चळवळ स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी आमदार गणेश नाईक, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, संतोष केणी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचा कार्य अहवाल, दिवंगत करसन सिताराम भगत शासकीय योजना सहाय्य केंद्राचे उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिल्यास कष्टकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त याचा सन्मान होईल असे सांगत, नवी मुंबई पुनर्वसन सामजिक संस्थेच्या माध्यमातून गेलीं 5 वर्ष केलेल्या कामांचे व दशरथ भगत यांच्या कार्याचे कौतुक गणेश नाईक यांनी यावेळी केले.
दि.बा.पाटील चळवळ स्पर्धेला मिळत असलेला वाढता उस्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता यातील चित्रकला, लेख, स्फूर्तिगीत लेखन, ऑडिओ, व्हिडीओ, दि. बा. पाटील साहेबांचे दुर्मिळ फोटो (अल्बम), वृत्तपत्र कात्रणे (न्यूज पेपर कटींग) ,चित्रीकरण ( व्हिडीओ शूटिंग) दि .बा .पाटील साहेबांचे हस्तलिखित पत्र, दि बां च्या आंदोलन व संघर्षांवर माहितीपट स्पर्धा, शॉर्ट फिल्म आदि साहित्य व कला स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवून ती 20 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आली असल्याचे दशरथ भगत यांनी दिली. यावेळी दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेच्या संयोजन समितीतील रविंद्र वाडकर, प्रशांत निगडे, किशोर पाटील, प्रवक्ते शैलेश घाग, डॉ. विवेक भोईर, सुधाकर लाड, गजानन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, तेजस पाटील, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संजय यादव, देवेंद्र खाडे, फशीबाई भगत, वैजयंती भगत, संदीप भगत, रामेश्वर दयाल शर्मा, हे उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai