धूतूमकरांचे उपोषण सफल
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 02, 2023
- 518
प्रकल्पग्रस्तांच्या भरतीला जानेवारीचा मुहुर्त
उरण ः धूतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या इंडीयन ऑईल टँकिंग अर्थात इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स या कंपनीत भुमीपुत्रांना डावलून सुरु केलेल्या परप्रांतीय भरती विरोधात 20 नोव्हेंबरपासून धुतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर कंपनी प्रशासनाला उपोषण कर्त्यांपुढे नमते घेतले. 6 जानेवारी 2024 पासून प्रथम 10 प्रकल्पग्रस्तांची भरती करुन उर्वरित प्रकल्पग्रस्तांची भरती प्रक्रिया टप्प्या टप्प्याने करण्यात येणार असल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.
1997 साली धुतूम ग्रामपंचायत हद्दीमध्ये इंडीयन ऑईल टँकिंग ही कंपनी सुरू झाली. या कंपनीसाठी सुमारे 85 शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादित झाल्या. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीच्या नोकर भरतीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या 25 वर्षांत गावातील फक्त तिघांना कंपनीच्या मुख्य कर्मचाऱ्यांत सामावून घेण्यात आले असून बहुतेक कामगार भरती परराज्यातून करण्यात आली. या अन्यायाविरोधात धूतूम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी लढा सुरु केला. आय ओ.टी.एल कंपनीच्या बेलगाम कारभारा विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सदर कंपनी प्रशासनाने स्थानिक तरुणांना तत्काळ रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसाठी कंपनी विरोधात 20 नोव्हेंबरपासून धुतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आमरण उपोषण सुरु केले होते. कंपनी प्रशासन, पोलीस प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात 3 वेळा बैठकी झाल्या मात्र त्या असफल ठरल्या. 28 नोव्हेंबर 2023 रोजी आंदोलनाचा नववा दिवस होता. उपोषण कर्त्यांचे आक्रमक भूमिका पाहता दिनांक त्याचदिवसी संध्याकाळी आयओटीएल कंपनीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, आयओटीएल कंपनी प्रशासनाचे एचआर संदीप काळे,टर्मिनल हेड भूपेश शर्मा, कंपनीचे एकझूकूटिव्ह ऑफिसर सिद्धार्थ एडके,अधिकारी सतीश म्हात्रे, कॉन्ट्रॅक्टर विलास ठाकूर, अविनाश ठाकूर,धुतुम ग्रामपंचायतचे सदस्य प्रेमनाथ ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 6 जानेवारी 2024 पासून प्रथम 10 प्रकल्पग्रस्तांची भरती करण्याचे प्रथमतः मान्य करून उर्वरित प्रकल्पग्रस्तांची भरती प्रक्रिया टप्प्या टप्प्याने करण्यात येणार असल्याचे कंपनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. उपोषण कर्त्यांचे या बैठकीत मागण्या मान्य झाल्याने उपोषणकर्त्यांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सरबत पाजून उपोषणाची सांगता केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai