विनापरवानगी बांधकामांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 10, 2024
- 297
नवी मुंबई ः महापालिकेच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या विनापरवनगी बांधकामांवर पालिकेने हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत कोपरखैरणे व घणसोली येथील दोन बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली.
कोपरखैरणे विभाग अंतर्गत हजीफुर रहमान खान व सबरीन हजीफुर रेहमान खान, रुम नं.877 व 878, सेक्टर-6, कोपरखैरणे, नवी मुंबई यांनी पालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी. स्वरूपाचे बांधकाम सुरू केले होते. तसेच महालक्ष्मी को.ऑप.हौ.सो.लि., भुखंड क्रमांक 21, सेक्टर-11, येथेही अवैध बांधकाम सुरु होते. या दोन्ही अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदरची तीनही अनधिकृत बांधकामे 08 फेब्रुवारी रोजी निष्कासित करण्यात आलेली आहेत.
घणसोली विभागातही तीन विनापरवानगी बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. मरिआई गोठिवलीजवळ, घणसोली यांचे तळमजला + तिस-या मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते, शिवाजी तलाव परिसर कापरीबाबा नगर यांचे आर.सी.सी. जोत्याचे काम व आणखी दुसरे तळमजला+पहिल्या मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते. पालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे ही कामे सुरु होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरच्या तीन ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिका व मे. सिडको यांनी संयुक्त तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai