28.7 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 02, 2024
- 313
दोन दिवसांच्या कारवाईत 90 हजार दंडात्मक रक्कम वसूल
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महापालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सर्वच विभाग कार्यक्षेत्रात एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.
अशा एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेअंतर्गत 26 व 27 मार्च 2024 रोजी सर्व विभागीय कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली तसेच धडक कारवाई करीत दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण रू. 90 हजार दंडात्मक रक्कम तसेच 28 किलो 700 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात 4 व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करीत 20 हजार दंडात्मक रक्कम व 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. नेरूळ विभागात 2 व्यावसायिक, आस्थापनांवर कारवाई करीत 10 हजार दंडात्मक रक्कम व 4 किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली. वाशी विभागातही 3 व्यावसायिक, आस्थापनांवर कारवाई करण्यात आली व त्यामध्ये 15 हजार दंड वसूली व 3 किलो प्लास्टिक जप्ती करण्यात आली. तुर्भे विभागात 3 व्यावसायिकांवरील कारवाईत 15 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 8 किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. कोपरखैरणे विभागातील कारवाईत 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 2.5 किलो प्लास्टिक साठा जप्ती 2 व्यावसायिकांकडून करण्यात आली तसेच घणसोली विभागातून 1 व्यावसायिकावर कारवाई करीत 5 हजार रक्कमेची दंडवसूली व 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ऐरोली विभागातही 10 हजार दंडात्मक रक्कम आणि 2 किलो 300 ग्रॅम प्लास्टिक साठा 2 व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आला.
परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने 1 व्यावसायिकाकडून 900 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्ती आणि 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. अशाप्रकारे 90 हजार दंडात्मक रक्कम वसूली तसेच 28 किलो 700 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचे साहित्य 18 व्यावसायिक / आस्थापना यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ही प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही एकल वापर प्लास्टिक वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai