फळ मार्केटच्या माजी संचालकांना अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 27, 2024
- 363
एपीएमसी शौचालय घोटाळा प्रकरण; अन्य संचालकांवर अटकेची टांगती तलवार
नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आले आहे. हि अटक बुधवारी संध्याकाळी करण्यात आली असून अन्य संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि साताराचे विद्यमान उमेदवार शशिकांत शिंदे यांना अंतरिम जमीन मिळालेला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत शौचालय चालविण्यास देण्यात येणाऱ्या कंत्राटामध्ये अत्यंत कमी दरात कंत्राट देत शासनाचे 7 कोटी 61 लाख 49 हजार 689 रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. गेले काही महिने या प्रकरणात कुठलीही प्रगती नव्हती. मात्र मंगळवारी अचानक कांदा बटाटा बाजार समितीचे माजी सभापती अशोक वाळुंज यांना चौकशीसाठी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. तर बुधवारी संध्याकाळी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना थेट अटक केले आहे. संजय पानसरे हे एपीएमसीतील सर्व बाजार समितीतील संचालक पैकी सर्वाधिक ताकदवर संचालक समजले जातात. त्यांनाच अटक झाल्याने अन्य माजाची संचालकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांना विचारणा केली असता संजय पानसरे यांना अटक केली असून शौचालय घोटाळा प्रकरणी अटक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कांदा बटाटा मार्केटचे संचालक वाळुंज यांना चौकशी साठी बोलावण्यात आले होते. याला त्यांनी दुजोरा दिला मात्र अन्य तपशील सांगण्यात असमर्थता दर्शवली.
- काय आहे प्रकरण?
मुंबई कृषी उत्पन्न बाजर समिती आवारात असणाऱ्या शौचालय चालवण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट मध्ये विविध 19 प्रकारच्या अनियमीता आढळून आल्या होत्या. याच कारणाने सरकारचे 7 कोटी 61 लाख 49 हजार 689 रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका आमदार शशिकांत शिंदे यांच्या सह अन्य सात असे एकूण आठ जणांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2023 मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आता पर्यंत या प्रकरणात पाच पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सात पैकी दोन जण समितीतील अधिकारी आहेत तर अन्य कंत्राटदार आहेत. तर शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन देण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai