पालिकेच्या 49 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2024
- 360
पाचवीतील 28 व आठवीतील 21 विद्यार्थ्यांचा समावेश
नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 42, घणसोली येथील विद्यार्थिनी दिप्ती कैलास पाटील 84.56 टक्के गुण संपादन करीत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शाळांमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. यावर्षी नमुंमपा शाळांमधील इयत्ता पाचवीतील 28 व इयत्ता आठवीतील 21 असे एकूण 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी याची परीक्षा रविवार, 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतून इयत्ता 5 वीतील 3394 विद्यार्थी व इयत्ता 8 वीतील 2631 विद्यार्थी असे एकूण 6025 विद्यार्थी परीक्षेस बसले होते व त्यापैकी इयत्ता 5 वीतील 3246 विद्यार्थी व इयत्ता 8 वीतील 2501 विद्यार्थी अशा एकूण 5747 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.यामध्ये नवी मुंबई महापालिका शाळांतून इयत्ता 5 वीतील 559 व इयत्ता 8 वीतील 521 असे एकूण 1080 विद्यार्थी दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी इयत्ता 5 वीतील 28 विद्यार्थी व इयत्ता 8 वीतील 21 विद्यार्थी अशाप्रकारे एकूण 49 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले.
या विद्यार्थ्यांमधून इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दिप्ती कैलास पाटील (शाळा क्र.42, घणसोली) ही विद्यार्थिनी 84.56% गुण संपादन करून ठाणे जिल्हयातून व अर्थातच नवी मुंबई क्षेत्रातून सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. तसेच इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तनुश्री निलेश टावरे (राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र.55, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, राबाडे) ही विद्यार्थिनी 78.91% गुण प्राप्त करून नवी मुंबई क्षेत्रातून सर्वप्रथम आलेली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींची व सर्वच गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांची कामगिरी अभिमानास्पद व कौतुकास्पद असून याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक दर्जाचा नावलौकिक उंचावला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai