कविता डॉट कॉमची कवी संमेलनातून ‘गुरुवंदना'
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2024
- 428
40 कवींनी सहभाग घेऊन रंगवली मैफिली
नवी मुंबई ः गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन शिवतुतारी प्रतिष्ठान संचलित कविता डॉट कॉमच्या वतीने खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरु असतानाही मुंबई, पुणे, ठाणे, सह उपनगरांतून 40 कविंनी सहभागी होऊन विविध विषयांवर कविता सादरीकरण करुन विद्याभवन शाळा परिसरात कवितांचा पाऊस पाडला होता. या रंगलेल्या काव्यमैफिलीमध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही त्यांच्या कविता, गझल अनोख्या शैलीत सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कविता डॉट कॉमच्यावतीने दरमहिन्याला मासिक कविसंमेलनासह अनेक ठिकाणी प्रयोग केले जातात. रविवारी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नेरुळ येथील विद्याभवन शाळेमध्ये खुले कविसंमेलन आयोजित केले होते. नवोदित कविसांठीतर हा कार्यक्रम म्हणजे पर्वणीच ठरला. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, पुणे अशा विविध ठिकाणाहून आलेल्या 40 कवींनी सहभाग घेऊन गुरूपौर्णिमा साजरी केली. त्यांनी विविध विषयांवरील कविता सादर करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहित्यिक प्रमोद कर्नाड यांनी भुषविले तरी कवयित्री मृणाल केळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. कवयित्री मृणाल केळकर यांनी कविता डॉट कॉमच्या उपक्रमाचे कौतुक करत सुमधुर आवाजात कविता सादर केल्या. तर साहित्यिक प्रमोद कर्नाड यांनी कवितेचे महत्त्व विषद करत विविध आठवणी सांगितल्या. त्यांनी सादर केलेली “रंगलेल्या मैफिलीतुन मी असा जाऊ कसा” या गझलमुळे कार्यक्रमाला चार चांद लागलेच शिवाय श्रोतेही मंत्रमुग्ध झाले.
खेळीमेळीत पार पडलेल्या खुल्या कविसंमेलनात उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन शंकर गोपाळे यांनी करत कार्यक्रमात रंगत आणली. समारोप सत्रात नारायण लांडगे पाटील यांनी सूत्रसंचालन करत उपस्थितांना खळखळून हसवले. कविता डॉट कॉमचे निर्मिती सूत्रधार प्रा.रवींद्र पाटील यांनी मासिक संमेलनाचे नियोजन विषद करत कविता डॉट कॉमची भूमिका मांडली. कवी जितेंद्र लाड यांनी नियोजनाची भूमिका निभावत वैभव वऱ्हाडी यांनी उत्तम कार्यवाहक केले आणि रूद्राक्ष पातारे यांनी हा सुंदर कार्यक्रम नजरकैद केला. मान्यवरांच्या शुभहस्ते सहभागी कवींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकिता गोळे यांनी केले. त्यानंतर प्रसाद माळी आणि दिक्षिता लाड यांच्या पसायदानाने सांगता झाली. याप्रसंगी विद्याभवन शिक्षण संकुलाचे कुलसचिव दिनेश मिसाळ, मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ, गुंफणकार दिलीप जांभळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai