आचारसंहितेपुर्वी 908 कोटींची निविदा मंजुर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2024
- 443
कचरा वाहतुकीसाठी महापालिकेची लगीनघाई
नवी मुंबई ः पालिका क्षेत्रातील कचरा वाहतुकीची निविदा आचारसंहिता लागण्यापुर्वी मंजुर करण्यास नवी मुंबई महापालिकेला यश आले आहे. ही निविदा 908 कोटींची असून हे काम मे.एजी एनव्हीरो इन्फ्रा प्रो.प्रा.लि. कंपनीला 9 वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे. प्रतिदिन 767 टन कचरा जमा करुन तो तुर्भे येथील क्षेपणभुमीवर नेण्याचे काम ही कंपनी करणार आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज 767 टन कचरा निर्माण होत असून तुर्भे येथील क्षेपणभुमीवर शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येऊन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येते. तेथे येत असलेल्या प्लॅस्टिकवरही प्रक्रिया करुन ग्रॅन्युअल्स बनवण्यात येतात व त्यापासून प्लॅस्टिकच्या वस्तू वा रस्त्याच्या डांबरीकरणात ते वापरण्यात येतात. यापुर्वी 2014 साली हे काम याच कंपनीला देण्यात आले होते.
पालिकेने मागवलेल्या निविदेत पुन्हा एकदा मे.एजी एनव्हीरो इन्फ्रा प्रो.प्रा.लि. या कंपनीने बाजी मारली आहे. यावेळी महापालिकेने 3,195 रुपये प्रतिटन कचरा वाहतुकीसाठी ठेकेदाराला देणार आहे. यामध्ये ठेकेदाराला 61 मोठे कॉम्पॅक्टर, 37 मध्यम कॉम्पॅक्टर, 90 मिनी टिपर आणि 58 छोट्या गाड्या अशा एकुण 246 गाड्या कचरा वाहतुकीसाठी वापराव्या लागणार आहेत. नवी मुंबईतील रहिवासी क्षेत्र आणि एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रातून हा कचरा ठेकेदाराला उचलावा लागणार आहे. यासाठी 1552 मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. ही निविदा पुढील 9 वर्षांसाठी देण्यात आली असून दरवर्षी आरबीआय इंडेक्स प्रमाणे भाववाढ देण्याची तरतूद निविदेत आहे. याशिवाय ठेकेदाराला 24 हजार कचराकुंड्या नवी मुंबईत पुरवाव्या लागणार आहेत. यामध्ये हरित वाहतुकीचा समावेश केलेला नसून ती वाहतुक उद्यान विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन देशात अग्रगण्य असून पालिकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यावेळी ट्रॅकींग कंट्रोल कमांड सिस्टिम क्षेपणभुमीवर उभारण्यात येणार असून त्यामाध्यमातून कचरा वाहतुक व आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले.
- कंपनीचे शेअर्स वधारले
ॲन्टोनी वेस्ट हॅण्डलिंग्स प्रा.लि. यांची मे. एजी एनव्हीरो इन्फ्रा प्रो.प्रा. लि. ही सहयोगी कंपनी आहे. 908 कोटी रुपयांचे काम मिळाल्याची बातमी बाजारात पसरताच या कंपनीच्या शेअर्संनी मार्केटमध्ये उसली घेतली. एकाच दिवसात कंपनीच्या शेअर व्हॅल्युमध्ये 15 टक्के वाढ होऊन गुंतवणुकदारांना नफा झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai