नवी मुंबईत उभारणार आफ्रिका-भारत व्यापारी संकुल
- by मोना माळी-सणस
- Nov 29, 2024
- 580
खारघरच्या इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कमध्ये जागेला पंसती
नवी मुंबई ः केंद्र सरकारने आफ्रिका युनियन समिट 2023 मध्ये केलेल्या कराराला मुर्तरुप देण्यासाठी देशात आफ्रिका-भारत व्यापारी संकुल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हे संकुल उभारण्यासाठी आफ्रिका व भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कला पसंती दिल्याने आता नवी मुंबईत भारत-आफ्रिका व्यापारी संकुल उभे राहणार आहे.
भारत सरकारने आफ्रिकन युनियन समिट 2020 मध्ये आफ्रिका आणि भारत यामध्ये व्यापार वृद्धिंगत व्हावा म्हणून सामंजस्य करार केला होता. या कराराला 2023 मध्ये मुर्तरुप देण्यात आले असून या करारांतर्गत दोन्ही देशांमध्ये व्यापार, आधुनिक टेक्नॉलॉजीची देवाण-घेवाण, पर्यटन व दोन्ही देशांमध्ये उद्यमशिलता विकसीत होण्याच्या दृष्टीने आफ्रिका-भारत बिजनेस कॉम्प्लेक्स भारतात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कॉम्प्लेक्समध्ये कॉन्फरन्स हॉल, ऑडिटोरियम, म्युझियम, दोन्ही देशांच्या आर्ट गॅलरी, शॉपिंग ऑर्केड, सांस्कृतिक भवन, हॉटेल व आरोग्य सुविधेबरोबर मनोरंजनासह खेळासाठी जागा ठेवण्यात येणार आहे. सुमारे 40 लाख चौ.मी. चे बांधकाम यासाठी करण्यात येणार आहे. या संकल्पनेतून 55 आफ्रिकन देशांना व्यापाराद्वारे जोडण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 25 हजार रोजगार निर्मितीसह 4 हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणुक येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देशातील स्थानिक रोजगाराला व पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पात ठेवण्यात आले आहे.
हे संकुल महाराष्ट्रात उभे राहावे म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला याबाबत जागा उपलब्ध करुन देण्यास सांगितले हेोते. जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना नैना मधील शिरढोण व खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क येथील जागा दाखवण्यात आल्या. या प्रकल्पासाठी 25 ते 30 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रतिनिधींनी खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क मधील जागेला पसंती दाखवली असून सिडकोने त्यासाठी 13 हेक्टर जागा देण्याची तयारी सरकारला दाखवली आहे. संचालक मंडळाने ऑगस्टमधील झालेल्या बैठकीत त्यास मंजुरी दिली असून भविष्यात भारत-आफ्रिका बिजनेस पार्क खारघमध्ये उभे राहिल्यास नवी मुंबईच्या भुषणात भर पडेल अशी चर्चा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस