आम जनता पक्षाने दिली नवी मुंबईच्या नेतृत्वांना संधी
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 15, 2025
- 501
नवी मुंबई ः आम जनता डेमोक्रॅटिक पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून नवी मुंबईतील खारघर येथे राहणारे तुकाराम बाबुराव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लक्ष्मण रामचंद्र साठे यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमणुक केली आहे.
आम जनता डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष द्यानंद मोरे यांनी 30 जानेवारीच्या पत्रान्वये तुकाराम आंधळे यांची महाराष्ट्रातील कार्यकारी समितीचे अध्यक्षपदी निवड केल्याचे कळविले आहे. त्याचबरोबर नवी मुंबईत राहणारे लक्ष्मण साठे यांचीही पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. या दोन्ही महत्वाच्या पदांवर नवी मुंबईतील नेतृत्वांना संधी दिल्याने त्यांच्यावर अभिनंदाचा वर्षाव होतआहे.
महाराष्ट्र कार्यकारी समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र म्हणून, सर्वपक्षीय समन्वयासाठी आपण जबाबदार असून, क्रियाकलाप, अंतर्गत व्यवहार व्यवस्थापित करणे आणि आपल्या राजकीय व्यासपीठाची प्रगती करण्यासाठी मदत करावी अशा सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष द्यानंद मोरे यांनी नवनियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai