नागरिकांच्या प्रश्नांसाठी खासदार आले भेटीला
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 197
नवी मुंबई : वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई पाठोपाठ ठाणे येथे जनता दरबार घेतल्यावर शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात ‘खासदार आपल्या भेटी’ला उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यांच्या पहिल्याच उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. जनता दरबारानंतर घेतलेल्या या खासदार भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र म्हस्के यांनी हा उपक्रम म्हणजे नवी मुंबईतील मतदाराला प्रत्यक्ष भेटून त्यांचे प्रश्न सोडवणे असून ही कोणाशीही स्पर्धा नाही असे पत्रकारांना सांगितले.
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या जनता दरबाराचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढण्यात आले. भाजपच्या आक्रमक राजकारणाचा हा भाग असल्याचे निरीक्षणही राजकीय वर्तुळात नोंदविण्यात आले. नाईक यांच्या जनता दरबाराला आठवडा उलटत नाही तोच ठाण्याचे शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी वाशीतील संपर्क कार्यालयात ‘खासदार आपल्या भेटीला’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी महापालिकेसह वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांशी देखील संवाद साधला. नवी मुंबईतील गावठाणांमधील गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न तसेच सिडको वसाहतींमधील घरांना पाठविण्यात आलेल्या नोटीसा प्रकरणी नागरिकांचे गाऱ्हाणे खासदारांनी यावेळी ऐकून घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा उपक्रम म्हणजे कोणाशीही स्पर्धा नाही, असे सांगितले.
नवी मुंबईचा जो मतदार आहे, त्याला प्रत्यक्ष भेटणे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही कुठलीही स्पर्धा नाही. जनता दरबार वगैरेला हे उत्तर तर अजिबात नाही, असे खासदार म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले. या ठिकाणचा मी खासदार आहे आणि पंधरवड्यात एकदा येथील रहिवाशांना भेटावे, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत ही माझी सुद्धा इच्छा होती. लोक त्यांच्या समस्या घेऊन ठाण्यात येत असतात. त्या तिथेही सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. परंतु मतदारसंघातील वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हस्के यांनी यावेळी सांगितले. मी या शहराचा खासदार आहे आणि महिन्यातून किमान एकदा तरी येथील लोकांशी संवाद साधण्यासाठी मी येणार आहे, असेही ते म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai