स्वच्छतेसाठी 2200 जणींची धाव
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2025
- 351
नवी मुंबई ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या सहयोगाने डॉ.डि वाय पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये 2200 हून अधिक विविध वयोगटातील महिलांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
‘चला धावूया स्वच्छ नवी मुंबईसाठी’ हा संदेश प्रसारित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून डॉ.डि वाय पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या वतीने कुलपती तथा अध्यक्ष डॉ.विजय पाटील यांच्या संकल्पनेतून, उपाध्यक्ष डॉ. शिवानी पाटील व डि.वाय.पाटील क्लायमेट ॲक्शन लॅबच्या प्रमुख राजलक्ष्मी पाटील यांच्या वतीने या मिनी महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई शहर स्वच्छतेच्या संदेश प्रसारणाचे ध्येय घेऊन संपन्न होणाऱ्या या उपक्रमात महानगरपालिकेचा सहयोग मिळावा अशाप्रकारे आयोजकांमार्फत करण्यात आलेल्या विनंतीनुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची या उपक्रमास मान्यता मिळाली व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमास महानगरपालिकेने सहकार्य केले.
जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी, सायन पनवेल महामार्गा जिकच्या सव्हस रोडवर असलेल्या डॉ. डि वाय पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशव्दारापासून या महिला मिनी मॅरेथॉनला प्रारंभ झाला. राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेत्या पालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या महिला मॅरेथॉनला प्रारंभ झाला. या महिला मिनी मॅरेथॉनचे विजेतेपद दामिनी पेडणेकर यांनी पटकाविले. तसेच व्दितीय क्रमांक प्रतिमा नसरत्ना व तृतीय क्रमांक सुजाता माने यांनी संपादन केला. 5 कि.मी. अंतराच्या ‘घे भरारी’ शिर्षकांतर्गत आयोजित या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील 2200 हून अधिक महिलांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला व आरोग्यपूर्ण जीवनाचे महत्वही अधोरेखीत केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai