
जि.प.शाळेचे आधुनिकीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 02, 2025
- 96
पनवेल : शाळेत शिकणाऱ्या मुलांना चांगले आणि स्वच्छ अभ्यासाचे वातावरण निर्माण व्हावे तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शाश्वत शिक्षण वातावरण प्रदान करून त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने पनवेल येथील शेलघर (उलवे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आयजी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने एनोबल सोशल इनोव्हेशन्सच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या नूतनीकरणात स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याचे पाण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. शाळेतील स्वच्छता सुविधा पूर्णपणे दुरुस्त करण्यात आल्या. प्रत्येक मजल्यावरील मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले. येथे शिकणाऱ्या मुलांना स्वच्छ शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी नवीन प्लंबिंग, नवीन टाइल्स, सुरक्षित दरवाजे, एक्झॉस्ट फॅन आणि पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी एक नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली. विद्यार्थ्यांना दिवसभर स्वच्छ आणि निरोगी पाणी मिळावे यासाठी प्युरिफायर, अपग्रेडेड प्लंबिंग आणि नवीन टाइल्स बसवण्यात आल्या. शाळेच्या प्रत्येक पैलूचे अपग्रेडेशन करण्यात आले. नवीन रंगरंगोटी, संरचनात्मक दुरुस्ती, सुधारित प्रकाशयोजना करण्यात आले. शाळेतील 11 वर्गखोल्या, संगणक प्रयोगशाळा, कार्यालय आणि कॉरिडॉरची पुनर्बांधणी प्लास्टरचे काम, भेगा दुरुस्त करून आणि रंगकाम करण्यात आले. खिडक्यांना सुरक्षित ग्रिल आणि जाळी बसवण्यात आली आणि मुख्य गेट मजबूत करण्यासाठी त्याची दुरुस्तीही करण्यात आली.
वर्गांमध्ये नवीन पंखे, दिवे आणि स्विच बोर्ड बसवून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडता यावे यासाठी संगणक प्रयोगशाळा पुनर्संचयित करण्यात आली. यावेळी आयजीपीएलचे कार्यकारी संचालक सागर जाधव, डॉ. व्ही.पी. राजकुमार सीएचआरओ आयजीपीएल, बाळाराम पाटील, माजी आमदार, वसंत पाटील, सीताराम मोहिते, गटशिक्षणाधिकारी, निंबाजी गीते, समीर पळसुले, राहुल जयस्वाल, एनोबलचे प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai