रोजगार निर्मितीत कोकण विभागाची उत्तुंग भरारी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 02, 2025
- 344
सुमारे सोळा हजार युवकांना मिळाले काम; तीन हजारांहून अधिक उद्योजकांना झाले कर्ज मंजूर
नवी मुंबई : शासनाच्या उद्योग विभागाच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून 3 हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून, यामधून सुमारे 16 हजाराहून अधिक युवांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजने अंतर्गत कोकण विभागातील चार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी 100% पेक्षा अधिकची कामगिरी केली असून कोकण विभागाचे जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेचे 2 हजार 760 प्रकरणांचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे.
चालू आर्थिक वर्षात कोकण विभागाकरिता 4 हजार 600 प्रकरणांचे उद्दीष्ट दिले असून त्याअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेला 2 हजार 760 प्रकरणांचे तर खादी व ग्रामोद्योग या यंत्रणेला 1 हजार 840 प्रकरणांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या अंतर्गत कोकण विभागाने एकूण 3 हजार 273 कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून यात रु.61 कोटी इतक्या अनुदान रकमेचा समावेश आहे. कोकण विभागाने पाचही जिल्हयाच्या जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेला देण्यात आलेले एकूण उद्दीष्ट सलग दुसऱ्यांदा 100 टक्केपेक्षा अधिक कामगिरी करुन पूर्ण केले आहे. तसेच विभागांतर्गतच्या रत्नागिरी जिल्हयाने जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेने- 151.46% व खादी व ग्रामोद्योग यंत्रणेने 28.13% उद्दीष्ट पुर्तता करुन जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट 102.13% नी पूर्ण केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग-125.83%, पालघर-101% कार्यालयानेही सलग दुसऱ्या वष अत्यंत भरीव कामगिरी केली आहे. याशिवाय रायगड जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयोनेही 104.5% प्रकरणे मंजूर करुन प्रथमत:च 100% पेक्षा अधिकची कामगिरी करुन इतिहास रचला आहे. ठाणे जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाने 54.03% कामगिरी करत कोकण विभागाच्या एकूण उद्दीष्टामध्ये सहभाग नोंदविला आहे. मंजूर प्रकरणांमध्ये 1 हजार 8 घटक हे उत्पादन क्षेत्रातील असून 2 हजार 265 हे घटक सेवा क्षेत्रातील आहे. यात 50% महिला व मागासवगय उद्योग घटकांचा समावेश आहे.
कर्ज प्रकरणांमधून सुमारे 16 हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असून विभागातील रोजगार निर्मितीला मोठया प्रमाणावर चालना मिळणार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्हयांने 83.38% मार्जिन मनी दावे सादर करुन महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत विभागामध्ये 100% पेक्षा अधिकची लक्षांकपूत करुन विभागीय उद्योग सह संचालक कार्यालय व रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्हयाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. कोकण विभागाने केलेली उल्लेखनिय कामगिरी विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी आणि विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली. तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी एम.देवेंद्र सिंह, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील, जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, जिल्हाधिकारी पालघर गोविंद बोडके, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिंनगारे यांचे मार्गदर्शन व उत्तम सहकार्य लाभले आहे. तसेच उद्योग सह संचालीका विजू सिरसाठ, कोकण विभाग आणि पाचही जिल्हयांचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, श्रीपाद दामले, गुरुशांतप्पा हरळय्या, उपेंद्र सांगळे, सीमा पवार, उद्योग उप संचालक, कोकण विभाग, सर्व व्यवस्थापक व उद्योग निरिक्षक तसेच सर्व जिल्हयांचे व बँक अधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे. भविष्यातदेखील कोकण विभाग आघाडीवर ठेवण्यासाठी प्रयत्न राहतील असे सहसंचालक यांनी सांगितले.
- युवा उद्योजकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना:-
राज्यातील शहरी व ग्रामीण भागात सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या स्थापनेव्दारे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निमती योजना कार्यक्रम राबविला जातो. या योजनेची अंमलबजावणी उद्योग संचालनालयाच्या नियंत्रणाखाली उद्योग सह संचालक कार्यालयामार्फत जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र खादी व ग्रामद्योग बोर्ड व बँकेद्वारे केली जाते. या वष नियोजनबद्ध कार्यक्रम आखून जास्तीत जास्त युवा उद्योजकांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. राज्यातील अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याची माहिती उद्योग सह संचालक, कोकण विभाग, विजू सिरसाठ यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai