मुस्लीम समाजाने केला दहशतवादाचा धिक्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2025
- 384
पनवेल : काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा पनवेलमधील मुस्लीम समाजाने बुधवारी (23 एप्रिल) धिक्कार करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मुस्लीम समाज पनवेलतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद अशी निषेधात्मक घोषणा देऊन दहशतवादाचा धिक्कार करण्यात आला. पहलगाममधील बैसरन येथे पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यात 30 निष्पाप जीवांनी जीव गमावला. गंभीर बाब म्हणजे नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या संपूर्ण हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे सकल मुस्लीम समाजाने ठणकावून सांगितले.
पनवेल शहरातील मुस्लीम नाक्याजवळील सुविधा मेडिकलजवळ बुधवारी सायंकाळी 5 वाजता निषेध मोर्चाला सुरुवात झाली. काळे झेंडे दाखवत, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत मुस्लीम समाज मोर्चात सहभागी झाला होता. दहशतवाद्यांनी मुसलमानांचे नाव घेऊन हल्ला केल्याने भारतातील मुस्लीम समाजाची बदनामी झाली आहे. मुसलमानांच्या नावाने उद्या कोणीही काहीही करू शकतो. परंतु भारतीय मुस्लीम नेहमीच देश हितासाठीच जगणार आहे, अशी प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लीम समाजाने दिली. या निषेध मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आली.
निषेध मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलीस बंदोबस्तात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मुस्लीम महिलांचा उल्लेखनीय सहभाग होता. इकबाल काझी, माजी नगरसेवक मुकीत काझी, जैनाब शेख, संतोष पवार, सोफिया मुकादम, सलमान मुकादम, पंचशील शिरसाट, जमीर पठाण, सुश्मिता मोहिते, रेहाना हुसेन, नावेद पटेल, नवाद पटेल, अदनान अन्सारी, बिस्मिल्ला करंबेळकर, सना शेख, सलमा कच्ची रजिया कच्ची, कैकशा शेख, मॅरियम करंबेलकर यांच्यासह अनेक पनवेलकर मोर्चात सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai