मालमत्ताकर बिले ऑनलाईन उपलब्ध
- by Aajchi Navi Mumbai
- May 20, 2025
- 215
यंदा प्रथमच 30 जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास मिळणार 10% अल बर्ड सवलत ; तसेच बिल वाटपासाठी बचत गटांच्या महिलांचा सहभाग
नवी मुंबई ः महापालिकेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 826 कोटी इतका आत्तापर्यंतचा सर्वाधिक मालमत्ताकर संकलीत केला आहे. यापुढील आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मालमत्ताकर वसूलीचे 1200 कोटी रुपयांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होताच विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये मालमत्ताकर ऑनलाईन भरण्याची सुविधा अधिक सक्षम करण्यात आली आहे. तसेच खास प्रोत्साहन सवलत (अल बर्ड स्कीम) जाहीर करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ताकर देयक वाटप प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कर देयके नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचविण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून शहराचा विकास अधिक सक्षमतने करण्याचा दृढ निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. यातील एक महत्वाचा बदल म्हणजे आर्थिक वर्ष 2025-2026 पासून वार्षिक मालमत्ताकर देयाकांचे वाटप वर्षातून एकदाच केले जाणार आहे. तसेच या नव्या आर्थिक वर्षात मालमत्ताकर भरणाऱ्यांसाठी खास प्रोत्साहन सवलत (अल बर्ड स्कीम) जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच नव्या आर्थिक वर्षांत मालमत्ताकर ऑनलाईन भरण्याची सुविधा अधिक सक्षम करण्यात आली आहे. याशिवाय मालमत्ताकर देयकांचे वितरण करण्यासाठी बचत गटांच्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मालमत्ताकर देयकांचे वाटप करण्यासाठी येणाऱ्या बचत गटाच्या महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
- बिले ऑनलाईन उपलब्ध
नवी मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष 2025-26 ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांना आपले कराचे बील घरबसल्या, कुठेही आणि केव्हाही पाहता व भरता यावे यादृष्टीने पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ॲपवर मालमत्ताकर बिले उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नागरिकांनी आपले मालमत्ताकर बिल 30 जून 2025 पर्यंत भरल्यास बिलातील सामान्य करावर 10% सवलतीचा लाभ मिळवता येणार आहे. - वार्षिक मालमत्ताकर देयकांचे वाटप तातडीने पूर्ण करणार
साडेतीन लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारक असणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 2024-2025 पर्यंत सहा महिन्यातून एकदा याप्रमाणे वर्षातून दोनदा घरपोच कर देयके वाटली जात होती. यामध्ये मालमत्ताकर विभागाकडे असणारा मोजका कर्मचारी वर्ग यांमुळे देयके वाटपास काहीसा विलंब होत होता. परिणामी मालमत्ताकर देयके नागरिकांपर्यंत उशीरा पोहोचून त्याचा परिणाम कर थकबाकी राहण्याकडे व्हायचा. हे टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने नवी मुंबईमधील सर्व मालमत्ताकर देयाकांचे वाटप यंदा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार नव्या वित्तीय वर्षापासून संपूर्ण वर्षात एकदाच मालमत्ताकर देयकांचे वाटप सुनियोजित रितीने गतीमानतेने केले जाणार आहे. - देयक वाटपासाठी बचत गटांच्या महिला मदतीला
वहित मुदतीत मालमत्ताकर देयकांचे वाटप करणे तसेच मालमत्ताकर विभागाच्या करसवलतीच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चांगला लोकसंपर्क असणाऱ्या कुशल अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीची गरज लक्षात घेत नवी मुंबई पालिका मालमत्ताकर विभाग पालिका क्षेत्रातील बचत गटांची मदत घेत आहे. आपले बचत गटाचे काम सांभाळून मालमत्ताकर विभागासाठी काम करणाऱ्या या महिलांना नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी मालमत्ताकर देयकांच्या वाटपासाठी प्रवेश देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. - मालमत्तेला आपला मोबईल नंबर लिंक करा
बचत गटाच्या महिला जेव्हा बिल वाटपासाठी येतील तेव्हा त्यांना मालमत्ताधारक नागरिकांनी आपले मोबाईल नंबर आणि इमेल आयडी अवश्य द्यावेत, जेणेकरून हे नंबर नागरिकांच्या मालमत्तेला जोडता येतील व पुढील मालमत्ताकर बिले एसएमएस संदेशाव्दारेही मिळू शकतील. नागरिक आपला मोबाईल नंबर आपल्या मालमत्तेला स्वत:ही संलग्न करू शकतात. त्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन क्यु आर कोड स्कॅन करावा आणि संबंधित माहिती भरावी असेही आवाहन आहे. - 10 % ची सवलत
नव्या 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ताकर भरणाऱ्यांसाठी खास प्रोत्साहन सवलत (अल बर्ड स्कीम) जाहीर करण्यात आली आहे. या सवलतीव्दारे 30 जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास नागरिकांना मालमत्ताकर बिलातील सामान्य करावर 10 % सवलतीचा लाभ घेता येईल.
मालमत्ताकर वसुलीला अधिक गतिमान आणि नागरिक सुलभ स्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ‘एक वर्ष, एक बिल’ ही नवी प्रणाली, कर बिलांना केवायसी जोडणे, मालमत्ताकर बिलांची ऑनलाईन उपलब्धता, कर भरण्याच्या डिजीटल पद्धतींचा प्रभावी वापर आणि बिल वाटपात बचत गटांच्या महिलांचा सहभाग हे बदल करवसूली प्रणाली नागरिकांना सहजसोपी करण्याप्रमाणेच करवसूलीला नियोजनबध्दता आणि गतीमानता प्रदान करणारे आहेत. तरी नागरिकांनी बिल वितरणासाठी येणाऱ्या बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे आणि 30 जून पूव कर भरणा करून बिलात सामान्य करावर जाहीर केलेल्या 10% सवलतीचा लाभ घ्यावा आणि शहर विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन आहे. - डॉ. कैलास शिंदे,आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai