डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2025
- 154
पाच जणांनी गमावली दृष्टी; पिता-पुत्र डॉक्टरवर गुन्हा दाखल
नवी मुंबई : वाशीतील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर पिता-पुत्रांनी केलेल्या मोतीबिंदु शस्त्रक्रियेेनंतर पाच रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. शस्त्रक्रियेत केलेल्या हलगर्जीपणामुळे या नेत्रतज्ज्ञ पिता पुत्रावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी येथील पंडित आय सर्जरी अँड लेजर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्याठिकाणी शहराच्या विविध भागातील काही व्यक्तींनी डोळ्यांशी संबंधित आजारावर उपचार घेतले होते. त्यामध्ये काहींच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली होती. त्यापैकी पाच जणांना शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांचा संसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेली होती. यामुळे त्यांनी शस्त्रक्रियेत झालेल्या हलगर्जी विरोधात वाशी पोलिसांकडे तक्रार केली होती. याबाबत पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक विभागाला कळवून अहवाल मागवला होता. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत हलगर्जी झाल्याचे नमूद केले आहे. तर शस्त्रक्रियेनंतर संबंधितांच्या डोळ्यांना सुडोमोनास विषाणूंच्या बाधेमुळे हा गंभीर आजार झाल्याचेही अहवालावरून स्पष्ट झाले. त्यावरून उपचारानंतर दृष्टी गमावलेल्या पाच जणांच्या तक्रारीवरून डॉ. चंदन पंडित व डॉ.डी.व्ही. पंडित या पितापुत्रांवर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेले डॉ. चंदन पंडित हे महापालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात नोकरीला आहेत. यानंतरही ते वडिलांच्या नावे वाशीत असलेल्या रुग्णालयात प्रॅक्टिस करत होते. ही बाब प्रशासनाच्या दृष्टीतून सुटली कशी, याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान ऐरोली रुग्णालयात त्यांच्याकडून रुग्णांना जाणीवपूर्वक बाहेरची औषधे लिहून दिली जायची अशाही तक्रारी समोर येत आहेत. डॉ.डी.व्ही. पंडित हे 87 वर्षांचे आहेत. या वयात त्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आहे की नाही याचीही तपासणी होत आहे. शिवाय दोन्ही डॉक्टरांकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतकडे त्यांचे परवाना नुतनीकरण केलेले नसल्याचेही पोलीसांना आढळून आल्याची माहिती आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai