तीस संस्थांनी केला पोलिसी दमनशाहीचा निषेध
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2025
- 196
नवी मुंबई ः छत्रपती संभाजीनगर येथील एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीच्या नात्याने तिला पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन मुली तसेच सामाजिक कार्यकर्त्या यांनी मदतीचा हात दिला. मात्र पोलीसांनी या मुलींना मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला. या मुली व त्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या यांच्या खांद्याला खांदा लावून पुण्यातील व महाराष्ट्रातील पोलिसी दमनशाहीच्या विरोधात नवी मुंबईतील 30 संस्था लढा देत आहेत. गुन्हा ताबडतोब नोंदवून घेऊन दोषींची चौकशी होऊन कार्यवाही केली जावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे.
या घटनेतील पिडीत महिलेला कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन मुली तसेच सामाजिक कार्यकर्त्या यांनी आपल्या राहत्या घरात आसरा दिला. तिला सर्व प्रकारची मदत केली मात्र संभाजीनगर येथील विवाहितेला मदत करणाऱ्या या मुलींचा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिला व पुरुष पोलिस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी चौकशीच्या नावाखाली छळ केला. त्यांचा स्त्री म्हणून लैंगिक अपमान होईल असे अपशब्द वापरून त्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला. कोथरूड पोलिस ठाण्यात तीन मुलींना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ झाल्याच्या आरोपावरून पोलिस आयुक्तालयात आंदोलन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित तीन मुलींसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्याबाबत पोलिसांविरोधातील व अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधातील मुलींच्या या लढाईत नवी मुंबईतील सर्व संस्था ठामपणे या मुलींच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. या मुली व त्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या यांच्या खांद्याला खांदा लावून पुण्यातील व महाराष्ट्रातील पोलिसी दमनशाहीच्या विरोधात नवी मुंबईतील सर्व संस्था लढा देत आहेत. स्त्री मुक्ती संघटना व अन्नपूर्णा परिवार यांच्या आयोजन पुढाकारातून नवी मुंबईतील जवळजवळ 30 संस्थानी एकत्र येऊन निवेदन तयार करून स्वाक्षरी मोहीम घेतली. 700 स्वाक्षऱ्यांचे हे निवेदन स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकण विभागीय अप्पर आयुक्त रवींद्र पवार यांना सादर केले. तर अन्नपूर्णा परिवारच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे हे निवेदन सादर केले आहे. या निवेदन आधारे पुण्यातील मुलींनी नोंदवलेला गुन्हा ताबडतोब नोंदवून घेऊन दोषींची चौकशी होऊन ताबडतोब कार्यवाही केली जावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. आमच्या स्वाक्षरी मोहिमेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला असून विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त सहभाग दिला आहे असे सांगत वृषाली मगदूम यांनी पोलिसांनी दाखवलेल्या या असंवेदनशील आणि दडपशाही वृत्तीचा आम्ही नवी मुंबईतील सर्व संस्था निषेध करत आहोत. गुन्हा नोंदविण्यासाठी पुढील पाठपुरावाही करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जोपर्यत गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत हे सामूहिक आंदोलन चालूच राहिल असे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai