विमानतळाला पालिका देणार प्रक्रियायुक्त पाणी
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2025
- 249
बेलापूर मलःप्रकिया केंद्रातून 5 एमएलडी पाणी देण्याचे नियोजन
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उभारलेल्या टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पाद्वारे पाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे पाणी एमआयडीसीतील अनेक कारखान्यांना विकत दिले जाते. आता नवी मुंबई विमानतळ प्राधिकारणाकडूनही पाच एमएलडी पाणी मागणीचा प्रस्ताव पालिकेकडे आला आहे. त्यानुसार विमानतळाला पाणी देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सात मलःनिसारण केंद्रातून प्रक्रियायुक्त पाणी वापराविना समुद्रात सोडण्यात येत होते. परंतु याच पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीकेंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प उभारण्यात आले. हे पुर्नप्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसी भागात विक्रि केले जाते. पालिका 18 रुपये 50 पैसे प्रतिघनमीटर दराने पाणीविक्री करते. आतापर्यंत एमआयडीसीकडून कंपन्यांना 22 रुपये 50 पैसे प्र.घ.मी. दराने पैसे आकारत होती. आता पालिकेकडून त्यांना 18.50 दराने पाणी मिळत असल्याने कंपन्यांचा फायदा होत आहे. तसेच पालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत मिळाला असून पाण्याचाही पुर्नवापर होत आहे. एमआयडीसी क्षेत्रात ज्या पध्दतीने एमआयडीसीतील कंपन्यांना जवळजवळ 17 एमएलडी प्रक्रियायुक्त पाणी दिले जाते. त्याच पद्धतीने आता नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला नवी मुंबई महापालिकेकडून प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ प्राधिकारणाकडूनही पाच एमएलडी पाणी मागणीचा प्रस्ताव आलेला आहे. त्यामुळे बेलापूर मलःनिसारण प्रकल्पातून हे पाणी नवी मुंबई विमानतळाला दिले जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai