दिवाळी अंक वाचन आणि संस्कृती वृद्धिंगत करते - सदानंद मोरे
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2025
- 67
पनवेल ः मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंदसोहळ्यापुरती मर्यादित नसून, दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण दिवाळी अंकाच्या अनुषंगाने ज्ञानाची सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24 व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि समारंभपूर्वक पार पडला. यावेळी दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटनही सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सदानंद मोरे यांनी पुढे बोलताना सांगितले कि, शतकी परंपरा असलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेला पुरस्कृत करून दिवाळी अंक परंपरेला सन्मान देण्याचे काम रामशेठ ठाकूर समाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने केले आहे. यावेळी त्यांनी साहित्य आणि वाचन याबद्दल उदाहरण देत दिवाळी अंकाचे महत्व अधोरेखित केले. दिवाळी अंक लेखन आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करते त्यामुळे दिवाळी अंक मराठी साहित्याचा अविभाज्य भाग असून रामशेठ ठाकूर लेखक साहित्यिक यांच्या पाठीशी आहेत आणि हे महाराष्ट्राला हेवा वाटेल असे त्यांचे कार्य आहे, असेही त्यांनी अधोरेखित करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समर्पक कार्याचे कौतुक केले. डिजिटलच्या युगात वर्तमानपत्राचे महत्व आजही कायम आहे. 90 टक्के पत्रकार दिवाळी अंकांची निर्मिती करत असतात. लेखन व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी हि दिवाळी अंक स्पर्धा असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद करत दिवाळी अंकांची गोडी कधीही कमी होणार नाही, असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
24 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत 01 लाख रुपये व सन्मानचिन्ह असलेला प्रथम क्रमांक अर्थात सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पुरस्कार हंस या अंकाने पटकाविला तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक इंद्रधनु अंकाने पटकाविला त्यांना 40 हजार रुपये आणि सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक-अंतरीचे प्रतिबिंब, तृतीय पारितोषिक-अक्षर, तर सर्वोत्कृष्ट विशेषांक-नवभारत, दृश्य कला विशेषांक मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक वयम, उत्तेजनार्थ छावा, उत्कृष्ट दिवाळी अंक-कालनिर्णय, सर्वोत्कृष्ट कथा-सत्याग्रह, मिलिंद बोकील (दीपावली), उत्कृष्ट कविता-आजकाल बायकाही..., लक्ष्मी यादव, पुरुष स्पंदन; लक्षवेधी परिसंवाद-असहमतीचा आवाज, ऋतुरंग; लक्षवेधी मुलाखत डॉ. सुनील लवटे, शब्दशिवार, इंदूमती गोंधळे; सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ-उत्तम अनुवाद, सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार-प्रभाकर वाईरकर, शब्द रूची; सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक-विवेक मेहेत्रे, उद्वेली-ऑल दि बेस्ट 2024; विशेष लेख-राजकारण की टोळीयुद्ध, आर्याबाग, विनय हर्डीकर यांनी तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक-आगरी दर्पण, तृतीय पारितोषिक शब्दसंवाद, उत्तेजनार्थ-लोकसेवक, साहित्य आभा, उत्कृष्ट कथा-रेखा नाबर, लोकसेवक, जिथे कमी तिथे मी; उत्कृष्ट कविता-हितवर्धक, कवी गणपत म्हात्रे, उत्कृष्ट व्यंगचित्रकार-विवेक मेहेत्रे-साहित्य आभा या अंकांनी पटकाविला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai