पुढील स्थानक ‘सीवूड्स दारावे-करावे’
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 77
रेल्वे स्थानकाचे नवीन नामबदल
नवी मुंबई : नवीमुंबईतील हार्बर मार्गावरील सर्वात मोठ्या आणि गजबजलेल्या सीवूड्स दारावे रेल्वे स्थानक नाव ‘सीवूड्स दारावे-करावे’ असे करण्यात येणार आहे. याबाबतचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच या स्थानकावर नव्या नावाची पाटी झळकणार आहे.
हार्बर मार्गाच्या विस्तारानंतरच येथे झपाट्याने लोकसंख्येत वाढ झाली. बेलापूर व नेरुळ रेल्वेस्थानकाच्या दरम्यान दारावे गावाजवळ रेल्वे फाटक होते. सुरुवातीला सीवूड्स रेल्वेस्थानक होण्यापूर्वी याच स्थानकाच्या नावाला दारावे ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यांनी सिडकोने लावलेल्या फलकाला काळे फासत आंदोलन केले होते. त्यांनतर या स्थानकाचे नाव सीवूड्स दारावे रेल्वेस्थानक झाले होते. त्यानंतर आता 20 वर्षानंतर पुन्हा एकदा या स्थानकाच्या नावात बदल होऊन सीवूड्स- दारावे- करावे असे करण्यात येणार आहे.
सीवूड्स स्थानकाला सीवूड्स दारावे नाव करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. तसेच एका बाजुला दारावे तर दुसऱ्या बाजुला करावे गाव असल्याने या आमच्या मूळ गावाचाही स्थानकाच्या नावात उल्लेख असावा यासाठी रेल्वे व शासन दरबारी प्रयत्न केला होता. त्याला यश मिळाले, अशी माहिती माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai