12 वर्षीय मयंकचा पुन्हा नवा विक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 51
भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी 24 किमी अंतर 7 तास 21 मिनिटे 6 सेकंदांत पार
उरण ः उरणचा 12 वर्षीय मयंक म्हात्रे याने भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी हे 24 किमी अंतर 7 तास 21 मिनिटे 6 सेकंदमध्ये पोहुन पार करत नवा विक्रम स्थापित केला आहे. मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. याआधी त्याने धरमतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा हे प्रवाह पोहून पार केले आहेत. तर त्याने पोहून पार केलेले तिनही प्रवाह प्रथम पोहून पार करण्याची नोंद मयंकच्या नावाने झाली आहे.
उरण सेंटमेरीज कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे याने नवा विक्रम स्थापित केला आहे. भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी हे 24 किमी अंतर त्याने 7 तास 21 मिनिटे 6 सेकंद या वेळेत पार करून आपल्या विक्रमची नवी नोंद केली आहे. मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. महत्वाचे म्हणजे मयंकने याआधी धरमतर ते करंजा जेट्टी हे 18 किमी अंतर पोहून पार केले. हा प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू होता. तर घारापुरी ते करंजा जेट्टी हे 18 कमी अंतर पोहून पार करणारा देखील तो पहिला जलतरणपटू ठरला. सलग तीन वर्षे मयंकने तीन समुद्रीय प्रवाह पोहून ओर केल्याने तो या तीनही प्रवाह पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे.
सोमवारी पहाटे 3:55 वाजता भाऊचा धक्का येथून मयंकने समुद्राच्या लाटांवर झेप घेत नव्या विक्रमाला सुरुवात केली. पहाटेचा काळोख, गार हवा, पाण्याच्या लाटा त्यातच मोठमोठ्या बोटींचा येणारा अडथळा यातून मार्ग काढत त्याने निर्धारीत वेळेत विक्रम पूर्ण केला आहे. त्याने केलेल्या या कामगिरीची महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने दखल घेत त्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. तर करंजा जेट्टी येथे विक्रम पूर्ण होताच करंजा ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.
हवामान आणि खडतर प्रवास यातून कुठेतरी मयंकचा आजचा विक्रमी प्रवास मी थांबवण्याच्या पवित्र्यात होतो. मात्र मयंकची जिद्ध आणि इव्हेन्ट पूर्ण करण्यासाठीची तळमळ पहाता त्याला त्याच्या प्रयत्नासाठी साथ दिली. भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. तर याआधी केलेले धरतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा हे दोनही प्रवाह पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. त्याला परदेशातील एक तरी चॅनल पोहताना पहायचं आहे. - दिनेश म्हात्रे, मयंकचे वडील
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai