उरणमध्ये भाजपचा सुपडा साफ
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2026
- 29
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत
उरण ः उरणमध्ये 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक झाली असून 4 जिल्हा परिषद पैकी 3 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. तर 8 पंचायत समिती सदस्य पदा पैकी 7 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा मिळून 12 जागापैकी 10 जागेवर महाविकास आघाडी निवडून आली आहे. भारतीय जनता पार्टीचा 1 जिल्हा परिषद सदस्य व 1 पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. या निकालामूळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(श्री शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटक पक्षाचे मिळून उरण मध्ये महाविकास आघाडी तयार करण्यात आली. भाजपला प्रत्यूतर देण्यासाठी महाविकास आघाडी तयार करून नियोजन बद्ध प्रचार करण्यात आला त्यामुळे उरण मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला आहे. मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिले असून भाजप ला स्पष्ट पणे नाकारले आहे. या निवडणुकीमुळे भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उरण तालुक्यात सुरवातीपासूनच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा अटीतटीचा सामना रंगला होता. उरण तालुक्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र असल्यामुळे हेच चित्र निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिसून आले. उरण मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वाधिक मताने निवडून आले असून त्या नंतर भाजपच्या उमेदवारांचा नंबर लागतो.आमदारकीच्या निवडणुकीत आ. महेश बालदी यांना चांगली मते मिळाली असल्यामुळे तीच मते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळतील असा विश्वास भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना होता. मात्र त्यांचा हा अंदाज खोटा ठरला. मतदारांनी तो अंदाज खोटा ठरविला.उरण मध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून या निकाला वरून 2029 चा आमदारकीचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल असा आशा तशा भावना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai