पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घसरल्या असून किंमती गेल्या 6 महिन्यातल्या निच्चांकी स्तरावर आल्या आहेत.

 पेट्रोल आज पेट्रोल 22-23 पैसे प्रति लीटर स्वस्त झालं आहे. तर डिझेलचे दरही 20-21 पैसे प्रति लीटर घसरून 64.10 रुपयांवर आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कच्चा तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी आल्याने पेट्रोल आण डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. कच्च्या तेलाच्या दरात 1 डॉलरचीही वाढ झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा काही हजार कोटींचा फटका बसतो.