पनवेलच्या बचतगटांनी केले राज्याचे प्रतिनिधीत्व
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 32
पनवेल ः अमृत व डे-एन.यु.एल.एम. कृतीसंगम कार्यक्रमांतर्गत स्थापन बचतगटातील सदस्यांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाद्वारे अमृत मित्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अमृत कार्यक्रमांतर्गत सहभागी बचतगटांचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाने दि.13 मार्च 2026 रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे अमृत महोत्सव आयोजित केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील निवड झालेल्या 14 महानगरपालिका, नगरपालिकांमधून पनवेल महापालिकेतील श्री महालक्ष्मी महिला बचतगट, काळुंद्रे या बचतगटाला राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
दिल्ली येथे झालेल्या अमृत महोत्सव कार्यक्रमात देशभरातील 30 राज्यांमधील महिला बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातून एकूण 14 महानगरपालिका / नगरपालिका यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये पनवेल महापालिकेला महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत योजनचे नोडल अधिकारी कैलास गावडे व पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता विलास चव्हाण यांच्या सूचनेनुसार अमृत मित्र उपक्रमांतर्गत स्वयंसहाय्यता बचतगटातील सदस्यांची अमृत मित्र म्हणून निवड करून त्यांना अमृत अभियानातील विविध प्रकल्पांशी निगडीत पाणी पुरवठा, मलनिस्सारण, हरित क्षेत्र विकास व वृक्षारोपण यांसारखी कामे देण्यात येत आहेत. या कामांचे अनुभव, त्यामधील उत्साह तसेच या कामातून मिळालेल्या उत्पन्नाचा केलेला योग्य वापर याविषयी महिलांनी या कार्यक्रमांत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी डेएनयुएलएम विभागाचे उपायुक्त अभिषेक पराडकर व सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने यांचे मार्गदर्शन लाभले. डेएनयुएलएम विभागाच्या शहर अभियान व्यवस्थापक विनया म्हात्रे व कर्मचारी कोमल रोकडे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमास श्री महालक्ष्मी महिला बचतगट, काळुंद्रे येथील महिला या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai