महिलांसाठी विनामूल्य नाडीपरीक्षण शिबीर

नवी मुंबई ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयुर्वेदिक आरोग्य निगा क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेली आघाडीची संस्था आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटरतर्फे सर्व वयोगटातील महिलांसाठी खारघर येथे रविवार, 8 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विनामूल्य नाडीपरीक्षण शिबिर आणि मोफत आरोग्य सल्लाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर, क्रिस्टल प्लाझा येथील केंद्रामध्ये हे आरोग्य शिबीर चालणार असून आरोग्याच्या विविध समस्यांनी पछाडलेल्या महिला या संधीचा लाभ घेऊ शकतात. तसेच महिलांना आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्यांना यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सल्ला देण्यात येईल.