साधना सप्ताहामुळे कर्मचारी होणार फ्युचर रेडी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 26
02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान
नवी मुंबई : प्रशासकीय कामात गतीमानता आणण्यासाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोकण विभागातील सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा बैठक घेतली. दि. 02 ते 08 एप्रिल 2026 या कालावधीत चालणाऱ्या या सप्ताहात कोकण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.02 ते 08 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित केला आहे. महाराष्ट्रातही मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी साधना सप्ताह अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. साधना सप्ताहाचा मुख्य उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहेत.
प्रत्येक कर्मचाऱ्याने या सात दिवसांच्या कालावधीत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स, ब्लॉकचेन, आणि प्रभावी संवाद कौशल्य यांसारख्या आधुनिक विषयांवरील कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोकण विभागातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करून कौशल्यपूर्ण प्रशासनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
- उत्कृष्ट कामगिरीचा होणार गौरव
या मोहिमेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विभागांना आणि जिल्हा प्रशासनाला विशेष गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणाऱ्या टेक वारी 2.0 या कार्यक्रमात उत्कृष्ट विभागांना सन्मानित केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. ‘बदलत्या काळासोबत प्रशासनाने अद्ययावत होणे ही काळाची गरज आहे. साधना सप्ताहाच्या माध्यमातून मिळणारे हे ऑनलाईन प्रशिक्षण कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक प्रगतीसोबतच शासकीय कामाचा दर्जा सुधारण्यास मदत करेल. कोकण विभागाने यामध्ये आघाडी घ्यावी, अशी अपेक्षा कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवालयांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीला कोकण विभागातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai