शबरी घरकुल योजनेअंतर्गत 116 प्रस्ताव
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 18
कातकरी वस्तीला मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
पनवेल ः आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी गुरुवारी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कातकरी समाजाच्या वस्तीवर प्रत्यक्ष भेट दिली व त्यानंतर पालिका कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजनेअंतर्गत 116 प्रस्ताव पालिकेकडून सादर केले लवकरच पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल असे आढावा बैठकीत आयुक्तांनी सांगितले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 538 येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्कांबाबत ही क्षेत्रभेट व बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री अशोक वुईके यांनी महापौर नितीन पाटील आणि आदिवासी विकास विभाग ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांच्या समवेत आदिवासी वस्ती येथे भेट दिली. परिसराची पाहणी करून महसूल विभाग व पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी तेथील समाजमंदिरामध्ये बैठक घेऊन कातकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर पनवेल महानगरपालिका मुख्यालयात पनवेल महानगरपालिका आयुक्त व अधिकारी, आदिवासी विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित प्लॉटवरील कातकरी समाजाच्या मालकी हक्काबाबत चर्चा झाली असता महापालिकेकडून या विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे पनवेल महापौर नितीन पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजनेअंतर्गत 116 प्रस्ताव आदिवासी विकास विभागास मनपा कडून सादर करण्यात आले असून विविध शासकीय योजनांचा लाभ सर्व पात्र आदिवासी बांधवांना पुढील 3 महिन्यांत मिळेल यासाठी प्रयत्न करू असे मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1680 आदिवासी कुटुंबे आणि 20 आदिवासी वस्त्यांचा आढावा घेण्यात आला.
आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम जनमन योजना, राणी दुर्गावती योजना व विविध कल्याणकारी योजनांची पनवेलच्या शहरी भागातील अंमलबजावणीची व सध्यस्थीतीची माहिती यावेळी मंत्री डॉ अशोक वुईके यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेऊन याबाबत सूचना दिल्या. शहरी भागातील आदिवासी समुदायकडे दुर्लक्ष होणार नाही, त्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविले जातील तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai