पालिका देणार 23.83 कोटींची शिष्यवृत्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 25
31,399 विद्यार्थ्यांना होणार लाभ
नवी मुंबई ः नवी मुंबई पालिका क्षेत्रातील विविध संवर्गातील 1 ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 23.83 कोटींची शिष्यवृत्ती वितरणाचे 4 प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवले होते. या सर्व प्रस्तावांना महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्यांची पडताळणी करुन पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून सन 2025-2026 या आर्थिक वर्षात इयत्ता 1 ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करणेसाठी 77 लक्ष 46 हजार 800 रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे. यामध्ये 986 पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी 8 कोटी 77 लाख 400 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 10,436 पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच याच शिषर्काअंतर्गत आणखी पात्र 16186 लाभार्थ्यांना सूमारे 11 कोटी 13 लाख 03 हजार 200 रुपयांच्या शिष्यवृत्ती वितरणासही मंजूरी मिळाली आहे. त्याचबरोबर विधवा, घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणेकरीता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार अर्जांची पडताळणी करुन पात्रता निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी 96 लाख 37 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. याअंतर्गत 1066 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून शहराची सेवा करणाऱ्या सफाई कामगारांच्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल दोन कोटी 19 लाख 34 हजार 400 रुपयांच्या शिष्यवृत्ती वितरणाचा प्रस्तावला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या प्रथम टप्प्यात दोन हजार 725 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, त्यासाठी एकूण दोन कोटी 19 लाख 34 हजार 400 रुपये खर्च अपेक्षित आहे.
मागासवर्गीय विद्यार्थी,आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी, विधवा व घटस्फोटित महिलांचे पाल्य, सफाई कामगार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुले या सर्व घटकातील पात्र 31,399 लाभर्थ्यांना तब्बल 23 कोटी 83 लाख 21 हजार 829 रुपयांची शिष्यवृत्ती पालिकेकडून वितरण करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai