खरातची नवी मुंबईत गुंतवणूक
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 100
काळ्याचे पांढरे केल्याचा अधिकाऱ्यांवर संशय
नवी मुंबई ः भोंदुबाबा अशोक खरात याला नवी मुंबईत जमीन मिळवून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतील काही अधिकारी पुढाकार घेत असल्याचे वृत्त आजची नवी मुंबईने प्रसिद्ध केले होते. त्यासाठी खरात याने महापालिकेत तीन वेळा भेट दिली होती. सदर वृत्त खरे ठरले असून खरात याने उरण येथील चाणजे येथे कवडीमोलाने 20 गुंठे जमीन घेतल्याचे उघडकीस आले असून त्यामध्ये अधिकाऱ्यांची गुंतवणुक तर नाही ना याचा तपास पोलीसांनी सुरु केल्याने संबंधिताचे धाबे दणाणले आहेत.
महिलांवरील अत्याचार आणि फसवणूकप्रकरणी अटकेत असणाऱ्या भोंदू खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार असतानाच त्याच्यावर नोंदवण्यात आलेल्या सहाव्या गुन्ह्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान खरातच्या नावे आणखी एका प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला असून, त्याची ही वक्रदृष्टी थेट मुंबई, तिसऱ्या मुंबईपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले. अशोक खरातला पोलिसांनी 17 मार्च रोजी अटक केली. त्याच दिवशी नवी मुंबईनजीकच्या उरणमधील जमीन व्यवहाराप्रकरणाची वर्दी नोटीस जारी करण्यात आली. आरोपी पोलीस कोठडीत असताना त्याच्या मालमत्तेची प्रक्रिया सुरू राहण्याची बाब अनेक शंकांना वाव देऊन गेली. उपलब्ध माहितीनुसार तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पातही खरातनं हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. खरातकडून उरणमध्येही स्वस्तात जमीन खरेदी करण्यात आली. जिथं, उरणमधील चाणजे गावात 58 लाख 50 हजारात त्याने जमीन खरेदी केली.
प्रत्यक्षात या जमिनीचा बाजारभाव 3 ते 4 कोटी असताना त्याने मात्र प्रचंड स्वस्त दरात ही जमीन खरेदी केली. येत्या काळात तिसऱ्या मुंबईच्या व्याप्तीमुळे या भागातील वाढणारे भूखंड दर पाहता खरातने इथेही गुंतवणूक केल्याचे स्पष्टच झाले आहे. खरातच्या अटकेच्या दिवशीच व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध झाली आणि तो कोठडीत असताना महिनाभरात 13 एप्रिलला फेरफाराची नोंद मंजूरही झाल्याने त्याच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भूखंड खरेदी किंवा तत्सम व्यवहारांसाठी जिथे सामान्य नागरिकांना वारंवार येरझऱ्या मारायला लागतात तिथंच महसूल विभागाने या खरातसाठी मात्र महिन्याभरातच प्रक्रिया आटोपल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे. ज्यामुळं महसूल विभागाच्या कारभारासमवेत काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचे चित्र आहे. या व्यवहारात शासकीय अधिकाऱ्यांची गुंतवणुक तर नाहीना याचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai