स्थायी समितीत विविध विषयांना मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2026
- 36
पनवेल ः महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा दि.27 एप्रिल रोजी पार पडली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली. पावसाळी गटारे बांधणे, कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मुदतवाढ देणे, 10 ठिकाणी क्रॉप्स फिट मल्टी जिम स्टेशन बसवणे, पथदिवे बसवणे, विहिरींचे पुनरूज्जीवन अशा अनेक विषयांना सभेत मंजुरी मिळाली.
पनवेल महानगरपालिकेकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ यांच्याकडून कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या 30 सुरक्षा रक्षक यांस 11 महिने कालावधी करीता कंत्राटी पध्दतीने मुदतवाढ देणेबाबतच्या विषयास संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन विषयास मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ. खारघर मधील कोपरा तलाव (गणेश तलाव) लगत पादचारी पूल, संरक्षण भिंत व पावसाळी गटार बांधण्याच्या विषयास स्थायी समितीच्या सभेमध्ये मान्यता देण्यात आली. पनवेल पालिका हद्दीतील विविध 10 ठिकाणी क्रॉप्स फिट मल्टी जिम स्टेशन बसविण्याच्या विषयास स्थायी समिती सदस्यांनी मंजूर दिली. पालिका मालकीच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामधील मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणेची दोन वर्षाकरिता दैनंदिन परिचालन देखभाल, दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पनवेल भाजी मार्केट रस्त्यावर मध्यभागी डेकोरेटिव्ह पथदिप खांब उभारुन कार्यान्वित करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली. पालिका कार्यक्षेत्रातील विहिरींची दुरूस्ती, पुनरूज्जीवन आणि जीर्णोध्दार या कामाकरिता प्राप्त न्युनतम निविदा दरास मान्यता मिळणेच्या विषयास मंजूरी देण्यात आली. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ. मधील खारघर नोड मधील अंतर्गत डांवरी रस्त्यांचे पुनपृष्टीकरण करणे. या कामाच्या सकारात्मक व नकारात्मकतेला मान्यता मिळणेबाबतच्या विषयास मंजूरी देण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai