मेट्रो स्थानकावर मॉक ड्रील
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 23
नवी मुंबई ः स्थानकाचा ताबा घेणे आणि बॉम्ब ठेवल्याची धमकी यांसारख्या आपत्कालीन प्रसंगांना सामोरे जाण्याची सिद्धता तपासण्याकरिता नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरवरील सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकावर व्यापक आपत्कालीन प्रतिसाद मॉक ड्रील दि. 20 मे 2026 रोजी पार पडले. नवी मुंबई पोलीसांचे शीघ्र प्रतिसाद दल (क्यूआरटी टीम) आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून सदर मॉक ड्रील पार पाडण्यात आले.
संघटनांतर्गत समन्वय, प्रतिसाद कार्यक्षमता, निर्वासन प्रक्रिया, दळणवळण शिष्टाचार आणि मेट्रो स्थानकांवरील सुरक्षाविषयक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची एकंदर सिद्धता, या बाबींचे मूल्यमापन करून बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने मॉक ड्रील पार पाडण्यात आले.
मॉक ड्रील दरम्यान स्थानकाचा अनधिकृतरीत्या ताबा घेणे आणि स्थानकावर स्फोटक वस्तू ठेवल्याचा संशय, या परिस्थितीचे सदृशीकरण (डर्ळाीश्ररींळेप) करण्यात आले. आपत्कालीन प्रतिसाद कार्यान्वित झाल्यावर प्रशिक्षित जवानांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढणे, स्थानक विलगीकरण, धमकीची सत्यता पडताळून पाहणे, गर्दी व्यवस्थापन आणि समन्वित डावपेचात्मक प्रतिसाद उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली. मॉक ड्रील दरम्यान पोलीस कर्मचारी आणि मेट्रो कर्मचाऱ्यांसह क्यूआरटी टीमने जलद हालचाल आणि एककालिक कार्यकारी प्रतिसाद यांचे प्रात्यक्षिक केले. या ड्रील अंतर्गत आपत्कालीन दळणवळण प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाययोजना कार्यान्वित करणे आणि वैद्यकीय व आपत्कालीन प्रतिसाद पथकांबरोबर समन्वय साधणे या बाबींचा देखील समावेश होता. या प्रसंगी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी, क्यूआरटी टीम, सिडको आणि महा मेट्रोचे अधिकारी यांनी सहभागी दलांनी दाखवलेल्या व्यावासायिक कौशल्य व त्वरित प्रतिसाद याबद्दल त्याची प्रशंसा केली. या मॉक ड्रीलद्वारे कार्यकारी सिद्धता पडताळण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी आणि पायाभूत सुविधा सुरक्षेकरिता कराव्या लागणाऱ्या आपत्कालीन उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्यास मदत झाली.
सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्याकरिता लागणाऱ्या उच्चस्तरीय सिद्धतेसह, मेट्रो प्रवाशांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास अशा प्रकारची मॉक ड्रील उपयुक्त असल्याचे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai