विमानतळ नामकरणाची याचिका फेटाळली
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 20
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भूमीपुत्रांमध्ये असंतोष
नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. नवी मुंबईतील ऍड. विकास पाटील यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने नामकरणाचा अधिकार केंद्र व राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भूमीपुत्रांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
केंद्र व राज्य सरकार वारंवार नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव देणार असल्याचा पुनरुचार करीत असली तरी या संदर्भात निर्णय घेतला जात नाही. नवी मुंबई विमानतळ हे कार्यान्वित होऊन ऑक्टोबर पासून आठ महिने झाले असून वाहतुकीचा वेगही वाढला आहे. तर या विमानतळावरून लवकरच आंतराष्ट्रीय विमान सेवा ही सुरू होणार आहे. असे असले तरी या विमानतळाचा नामकरणाचा तिढा मात्र कायम आहे. नवी मुंबईसह देशभरातील शेतकऱ्यांना संघर्षातून त्यांचा हक्क मिळवून देणारे रायगडचे माजी खासदार दि. बा. यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या नामकरणाच्या मागणीसाठी पाच वर्षे लढा सुरू आहे. मात्र त्याचा निर्णय होत नाही. त्यामुळे प्रकाशझोत सामाजिक संस्थेच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर करणाऱ्या रिट कोर्टाला (न्यायालयाला), महाराष्ट्र सरकारने सादर केलेला प्रस्ताव स्वीकारण्याबाबत नागरी विमान मंत्रालयाला कोणताही आदेश देण्याचे अधिकार प्राप्त नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र तेथेही हे धोरण-निर्मितीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासारखे ठरेल, शासनालाच या संबंधी निर्णय घेऊ दे असे सांगत ही याचिका फेटाळून लावली.
विमानतळाचे नाव काय असावे, हे ठरवणे हे न्यायालयाचे काम आहे का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. विमानतळाचे नामकरण डी.बी. पाटील असे करण्याची मागणी होत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. राज्य सरकारने विमानतळाच्या नामकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही वकिलांनी नमूद केले. राज्य सरकारलाच हा विषय पुढे नेऊ द्या. लोकशाही व्यवस्थेत तुम्हाला काही विशिष्ट अधिकार प्राप्त असतात आणि तुम्ही त्या अधिकारांचा वापर करून आपला पाठपुरावा करू शकता. हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले.
नामकरणाचा प्रश्न हा न्यायालयाचा नसल्याने याचिका दाखल करु नये असे याचिकाकर्ते ऍड विकास पाटील यांना आपण सांगितले होते. यापूर्वी त्यांची या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या याचिकेशी आणि नामकरण आंदोलन याच्याशी काही संबंध नसून राज्य सरकारने आपला प्रस्ताव केंद्रा कडे पाठविला आहे. आणि तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच पारित होऊन नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव लागेलं असे आशावादी मत दिबांचे चिरंजीव अतुल दीबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai