हरवलेले दागिने, मोबाईल मुळ मालकांना परत
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 22
गुन्ह्यात हस्तगत केला 94 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल
खारघर : खारघर पोलिसांनी आपल्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत या गुन्ह्यातील तब्बल 94 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि 50 महागडे मोबाईल फोन खारघर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले. चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर चाकुने हल्ला करुन त्याचे 57 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा खारघर पोलिसांनी तपास करुन 7 आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेले 57 लाख रुपये किंमतीचे पूर्ण 57 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सांगली जिल्ह्यातून हस्तगत केले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या कारवाईत, खारघरमधील महिलेच्या घराचा दरवाजा बनावट चावीने उघडून त्यांच्या घरातील 27 लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेण्यात आली होती. या घरफोडीचा देखील खारघर पोलिसांनी छडा लावत पोलिसांनी 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेली 27 लाख रुपयांची संपूर्ण रोकड जशीच्या तशी जप्त केली आहे. त्याशिवाय खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2025 आणि 2026 मध्ये चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी खारघर पोलिसांनी सीईआयआर पोर्टल या तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर केला. तसेच महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि झारखंड या राज्यांमध्ये जाऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने 10 लाख 74 हजार रुपये किंमतीचे एकूण 50 मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. संपूर्ण देशातून 50 मोबाईल फोन हस्तगत करण्यामध्ये पोलीस शिपाई मोतीराम आगिवले यांनी विशेष आणि कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
खारघर पोलिसांनी या वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावून तब्बल 94 लाख 74 हजारांच्या मुद्देमालाचे हस्तगत केला आहे. हाच मुद्देमाल 19 मे रोजी खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या हस्ते मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. आपली चोरीला गेलेली रोख रक्कम, दागिने आणि मोहाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी खारघर पोलिसांचे आभार मानले. सदरची उल्लेखनीय कामगिरी खारघर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस निरीक्षक अशोक डमाळे, सुरज पाटील, शितल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे, पोलीस उपनिरीक्षक सुरज जाधव, आदिंच्या पथकाने केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai