वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रामुळे महिलांचे सक्षमीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 09, 2026
- 25
नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने टिसर आर्टिसन ट्रस्ट, आयडीएच व एसबीआय फाऊंडेशन यांच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर येथे सुरू असलेल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र मार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित महिला बचत गट उपजिविका संवाद कार्यक्रम प्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
सध्या वातावरणातील उष्म्याची स्थिती पाहता पर्यावरण बदलाचा किती त्रास होतो याचा अनुभव आपण घेत असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्व पर्यायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आपण वापरलेले कपडे टीआरएफ सेंटरव्दारे पुनर्वापरात आलेली आकर्षक वस्त्रे झाली व यामधून महिलांना नवी कौशल्ये शिकता आली आणि रोजगारही मिळाला हे या उपक्रमाचे यश असल्याचे सांगितले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या फॅशन शो चे कौतुक करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी टीआरएफ केंद्रात आलेल्या वापरलेल्या कपड्यांवर फॅशन सेन्स राखून केलेली नवनिर्मित वस्त्रे या विद्यार्थ्यांनी परिधान करून ज्या पध्दतीने सादर केली त्यामुळे या नव्या स्वरूपातील वस्त्रांचे महत्व अधिक कळले असे सांगितले. या प्रकल्पाच्या विस्तारातून नवी मुंबईतील महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील त्याचा उपयोग करून घ्यावा असेही आवाहन आयुक्तांनी केले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पर्यावरणाचा संबंध महिलांशी अधिक असतो असे सांगत जास्तीत जास्त महिला भगिनींना या उपक्रमाशी जोडून त्यांच्यामधील कौशल्यांना वाव देण्याचा उद्देशाने व या माध्यमातून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका महीला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आणखी सकारात्मक पावले उचलत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे गणवेश महिला बचत गटांकडून बनवून घेण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या केंद्राव्दारे टाकाऊ वस्त्रापासून 9 हजाराहून अधिक पुनर्प्रक्रियाकृत उत्पादने तयार करण्याचा मानस असल्याचे सांगत या उपक्रमाचा विस्तार करण्याचा मनोदय केंद्रीय वस्त्र समितीचे संचालक तपनकुमार रौत यांनी व्यक्त केला. टिसर आर्टिसन ट्रस्टच्या संस्थापक डॉ.मेघा फणसळकर यांनी आपली कोणतीही कृती पृथ्वीला घातक नको याची काळजी प्रत्येक माणसाने घेण्याचा निश्चय आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करायला हवा असे सांगत टीआरएफ सारखा उपक्रम महिलांच्या सृजनशक्तीला नवे दालन उपलब्ध करून देणारा असल्याचे मत मांडले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai