उरण उप-टपाल कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 24
उरण : नवी मुंबई डाक विभागाच्या अंतर्गत येणारे उरण उप-टपाल कार्यालय नवीन आणि सुसज्ज अशा इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. 20 मे पासून नवीन जागेतून टपाल कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.
उरण टपाल कार्यालय हे आता दुकान क्र. 104 आणि 105, पहिला मजला, पुष्कराज अपार्टमेंट, कामठा रोड, उरण, तालुका-उरण, जिल्हा-रायगड या नवीन पत्त्यावर स्थलांतरित झाले असून, 20 मे 2026 पासून या नवीन जागेतून टपाल कार्यालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. उरण टपाल कार्यालयामार्फत परिसरातील मोठ्या संख्येने असलेले स्थानिक नागरिक, शासकीय कार्यालये आणि इतर व्यावसायिक ग्राहकांना सेवा पुरवली जाते. त्यामुळे जुन्या कार्यालयाच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची तसेच ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि टपाल सेवा अखंडितपणे सुरू राहावी, या उद्देशाने प्रशासनाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. उरण परिसरातील सर्व नागरिकांनी, शासकीय संस्थांनी आणि ग्राहकांनी भविष्यातील सर्व प्रकारच्या टपाल व्यवहारांसाठी तसेच सेवांसाठी या नवीन पत्त्याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, अशी विनंती टपाल विभागामार्फत करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai